Maharashtra Municipal Election Result Highlights: राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आता आज म्हणजेच 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. ज्यामध्ये मुंबईतील 15 ठिकाणांचा समावेश आहे. अंतिम निकाल दुपारी 4 वाजेपर्यंत अपेक्षित आहेत.

15 जानेवारी रोजी राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक (Mahanagarpalika Nivadnuk Result 2026) झाली. या निवडणुकीसाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचे नशिब इव्हीएममध्ये कैद झाले आहे. आज त्यांच्या निकाल लागणार आहे. या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट,

पहिला निकाल आला हाती -

BMC Election Result : मुंबईचा पहिला निकाल हाती, काँग्रेसच्या आशा काळे विजयी

  • 2026-01-16 19:49:07

    Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Result 2026 Winner List - विजयी उमेदवारांची यादी

    Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Result 2026 Winner List: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 115 जागांसाठी इथे सर्वच राजकीय पक्ष मैदानात असून संभाजीनगरच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

    विजयी उमेदवारांची यादी सविस्तर वाचा…

  • 2026-01-16 19:48:41

    पाच शहरात काँग्रेसचा महापौर - सपकाळ

    Congress state president Sapkal: पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर 350 नगरसेवक आणि 10 ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 2026-01-16 19:47:43

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विशेष यश मिळाले नाही?

    BMC Election 2026 Result: महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. मात्र त्यांना या निवडणुकीत विशेष असे यश मिळाले नाही.

  • 2026-01-16 19:46:37

    एमआयएमने जिंकल्या 95 जागा

    एमआयएमने 13 महापालिकांमध्ये 95 जागा जिंकत आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. एमआयएमने छत्रपती संभाजीनगर, मालेगाव तसेच सोलापूरमध्येही नेत्रदीपक यश मिळवले आहे. मुंबईतही एमआयएमचे सहा नगरसेवक महापालिकेत गेले आहे.

  • 2026-01-16 19:45:50

    देवेंद्र फडणवीसांनी मतदारांचे मानले आभार

    BMC Election Results: भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी केले.

  • 2026-01-16 18:50:17

    100 प्रभागांमधील मतमोजणी अजून सुरू

    शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणतात, "...मुंबईत अंतिम निकाल मध्यरात्रीपर्यंत जाहीर होतील. आतापर्यंत समोर येत असलेले आकडे खोटे आहेत. जवळपास 100 प्रभागांमधील मतमोजणी अजून सुरू झालेली नाही.
  • 2026-01-16 16:57:37

    PCMC Election Result Winner List: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी 

    PCMC Election Result Winner List: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी काल(15 जानेवारीला) मतदान झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 65 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

    सर्व विजयी उमेदवारांची यादी 

  • 2026-01-16 15:53:36

    बीएमसी निवडणुकीत पक्षाची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यालयात जल्लोष.

    बीएमसी निवडणुकीत पक्षाची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यालयात जल्लोष.
  • 2026-01-16 14:51:57

    निकाल जाहीर, पुणे महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर

    pune election 2026 winners list: पुणे महानगरपालिकेच्या 41 प्रभागांतील 165 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ वाद आणि तक्रारींचे अपवाद वगळता शहरातील मतदान शांततेत पूर्ण झाले. आज निकाल जाहीर होत आहे. संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर…

  • 2026-01-16 14:09:07

    मुंबईला शिवसेना-भाजप युतीचा महापौर मिळणार - दिनेश शिंदे

    शिवसेनेचे माध्यम समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, "निवडणुकांच्या काळात पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण शिवसेना-भाजपने नेहमीच जनतेसमोर विकासाचा अजेंडा मांडला आहे. मुंबईला पुढे नेण्यासाठी आणि तिचा विकास करण्यासाठी, शिवसेना-भाजप सरकार काम करत राहणार आहे." शाईच्या खुणांच्या वादावर ते म्हणतात, "ती शाई मंजूर होती, जरी ती मार्करच्या स्वरूपात होती. केवळ मंजूर शाईचाच वापर करण्यात आला होता..." ते असेही म्हणतात, "मुंबईला शिवसेना-भाजप युतीचा महापौर मिळणार आहे..."
  • 2026-01-16 13:33:16

    आमदार अस्लम शेख यांची बहीण कमरजा सिद्धीकी विजयी

    BMC Result LIVE : मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. बीएमसीत आमदार अस्लम शेख यांची बहीण काँग्रेस उमेदवार कमरजा सिद्धीकी विजयी झाल्या आहेत. 
  • 2026-01-16 13:24:59

    एकनाथ शिंदेंनी गड राखला, ठाणे महानगरपालिका मध्ये आघाडी

    ठाणे महानगर पालिका मध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत विजयी आणि आघाडीचे कल
    • भाजप - 5
    • शिवसेना - 24
    • राष्ट्रवादी अजित पवार - 4
    • शिवसेना उद्धव ठाकरे - 0
    • राष्ट्रवादी शरद पवार - 4
    • काँग्रेस - 0
    • MIM - 5 इतर - 1
  • 2026-01-16 13:16:39

    ठाकरे सेनेच्या पूजा महाडेश्वर विजयी

    मुंबईतील प्रभाग क्रमांक 87 मधून ठाकरे सेनेच्या पूजा महाडेश्वर विजयी झाल्या आहेत. पूजा महाडेश्वर यांचा 2429 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भाजपाचे कृष्णा पारकर यांचा पराभव झाला आहे. कृष्णा पारकर यांना 9160 मते मिळाले आहेत.
  • 2026-01-16 12:54:36

    ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे आणि पियुष ललित कोल्हे विजयी

    महायुतीचे उमेदवार सिंधुताई कोल्हे आणि पियुष ललित कोल्हे यांनी गळाभेट घेतली, त्यांनी प्रभाग 11 मध्ये विजय मिळवला. ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे आणि पियुष ललित कोल्हे हे कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीत विजयी झाले. माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली. सविस्तर वाचा - 
  • 2026-01-16 12:44:46

    BMC Election 2026 Results Live: भाजपाच्या हेतल मार्वेकर विजयी

    मुंबईतील मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 103 वॉर्डमध्ये भाजपाच्या हेतल गाला मार्वेकर यांना 17334 मते, मनसे दीप्ती पांचाळ यांना 5205 मते, तर काँग्रेसच्या मनीषा सोनवणे यांना 3786 मते तर हेतल गाला मार्वेकर या विजयी झाल्या आहेत.
  • 2026-01-16 12:30:52

    Live Maharashtra Election Result 2026 Updates: मुंबईत महायुतीची मुसंडी, शतक केलं पार

    मुंबईत महायुतीची मुसंडी, शतक केलं पार
  • 2026-01-16 11:37:00

    शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव मोठ्या मताधिक्याने विजयी

    प्रभाग क्रमांक 1 मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव मोठ्या मताधिक्याने विजयी
  • 2026-01-16 11:37:00

    BMC Election Result LIVE: मुंबईचा पहिला निकाल हाती, काँग्रेसच्या आशा काळे विजयी

    BMC Election Result LIVE: मुंबईचा पहिला निकाल हाती, काँग्रेसच्या आशा काळे विजयी
  • बीएमसीत ठाकरे बंधूंनी घेतली आघाडीला, 54 जागांवर पुढे

    भाजपा 50 शिवसेना 26 ठाकरे बंधू 54
  • 2026-01-16 11:24:18

    maharashtra election results: पोलिसांनी लाठीचार्ज केला

    महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "आज मतमोजणी आहे, आणि अशा दिवशी, जेव्हा आमचे कार्यकर्ते केंद्रात येत होते, तेव्हा जवळपास 100 पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्यांना गंभीर जखमी केले... यावर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी गुन्हेगारांवर आपला जोर दाखवावा, कार्यकर्त्यांवर नाही... हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही त्यांच्या विरोधात एमएलसी (विधान परिषद सदस्य) यांच्याकडे तक्रार दाखल करत आहोत..."  
  • 2026-01-16 11:22:28

    छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा

    पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले, "आज येथे मतमोजणी सुरू आहे. येथे एक घटना घडली आहे... पोलीस आणि शिवसेना नेत्यांची भूमिका विचारात घेऊन डीसीपी या प्रकरणाची चौकशी करतील आणि त्यानंतर कारवाई केली जाईल... प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल..."  
  • 2026-01-16 10:57:29

    maharashtra election result: नागपुरात भाजपा आघाडीवर

    नागपूर भाजप 12 कांग्रेस 3
  • 2026-01-16 10:52:07

    Mahanagar Palika Election 2026 - छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 9 जागांवर आघाडीवर

    छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत जाहीर झालेल्या 115 जागांपैकी, भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे, त्यानंतर शिवसेना 5 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4 जागांवर आघाडीवर आहेत. एआयएमआयएमनेही 4 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
  • 2026-01-16 10:49:14

    Sanjay Raut: संजय राऊतांचे आयोगावर गंभीर आरोप

    Mumbai BMC Election Results: बीएमसी निवडणुकांबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हजारो लोकांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत, तसंच, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बैठक झाल्याचा आरोप केला.

    सविस्तर वाचा - 
  • 2026-01-16 10:44:18

    कल्याण डोंबिवलीतही भाजपा आघाडीवर

    कल्याण डोंबिवली भाजपा 14 शिंदे 6 पिपरी चिंचवड भाजपा 8 राष्ट्रवादी 6 ठाणे शिवसेना 6 भाजप 6
  • 2026-01-16 10:42:54

    Mumbai BMC Election Results: मुंबईत भाजपा आघाडीवर

    मुंबई आघाडीवर भाजप 26 शिंदे सेना 15 ठाकरे बंधू 18 कांग्रेस 5 इतर 6
  • 2026-01-16 10:30:38

    BMC Election Results Live: मुंबई मतदानाचा टक्का घसरला

    BMC Election Results Live: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 52.94 टक्के मतदान झाले, जे 2017 मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत 55.53 टक्के होते, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदान कमी झाले आहे.

  • 2026-01-16 10:15:08

    BMC Election results live: बीएमसी निवडणुकीसाठी मतमोजणी कलिना येथील मतमोजणी केंद्रावर सुरू

    बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी मतमोजणी कलिना येथील मतमोजणी केंद्रावर सुरू झाली आहे.
  • 2026-01-16 10:12:58

    ठाण्यात माजी महापौर आणि बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद

    Thane election results today: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. आझाद नगर परिसरात माजी महापौर आणि बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला.

  • 2026-01-16 10:11:32

    bmc election results live: राज्यातील 29 महापालिकेत मतमोजणी सुरु

    राज्यातील 29 महापालिकेत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे.
  • 2026-01-16 09:54:59

    बीएमसी निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत बदल

    मतमोजणी प्रक्रियेत बदल झाल्यामुळे मुंबईतील बीएमसी निवडणुकीचे निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. आता सर्व 227 वॉर्डांमध्ये एकाच वेळी न जाता टप्प्याटप्प्याने दोन वॉर्डमध्ये मतमोजणी केली जाईल. या नवीन नियमामुळे, सकाळी 10 वाजता फक्त 46 वॉर्डमध्ये मतमोजणी सुरू होईल, ज्यामुळे निकालांसाठी लागणारा वेळ वाढेल.
  • 2026-01-16 09:47:22

    पुणे महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे

    Pune PMC Civic Polls 2026 Results: पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. (Pune PMC Election Result) त्यासाठी 1,165 उमेदवार रिंगणात आहेत. आज पुणे महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार हे दुपारपर्यंत समजणार आहे.

  • 2026-01-16 09:46:22

    मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा थोड्याच वेळात निकाल

    Mumbai Municipal Election Result 2026 : राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल शुक्रवारी 16 जानेवारी रोजी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी शिवसेना ठाकरे गट व मनसे याची आघाडी आणि शिवसेना शिंदे गट व भाजपची महायुती लढत आहे. शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिली आहे. जाणून घेऊया क्षणा क्षणाचे अपडेट

  • 2026-01-16 09:45:22

    ठाणे महापालिकेची निवडणूक अटीतटीचा सामना

    Thane TMC Mahapalika Nivadnuk Result 2026 : शिंदे गट व भाजपची महायुती तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीने ठाणे महापालिकेची निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा ठाण्यात पणाला लागली आहे. या महापालिकेच्या निकालावर सर्वांच्या नजरा आहेत.

    सविस्तर वाचा - 
  • 2026-01-16 09:43:49

    सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू

    विल्सन कॉलेज येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. अधिकारी या प्रक्रियेसाठी सज्ज होत असताना, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  
  • 2026-01-16 09:40:29

    नाशिक महानगरपालिका निवडणूक कोण मारणार बाजी

    Nashik NMC Civic Polls 2026 Results: 2026 मधील नाशिक महानगरपालिका निवडणूक अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे अत्यंत निर्णायक ठरली. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, नागरी सुविधा आणि एकूणच शहरी प्रशासन या विषयांवर मतदारांचे लक्ष केंद्रित होते. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे.

  • 2026-01-16 09:37:36

    कोल्हापूर महापालिकेत कोण मारणार बाजी

    Kolhapur Mahapalika Nivadnuk Result 2026 : कोल्हापूर महापालिकेसाठी (Kolhapur Election Result,) महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात लढत आहे. आज मजदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजुंनी विजयाचे दावे केले जात आहे. कोल्हापूरच्या मैदानात कोणी मारली बाजी, वाचा विजयी उमेदवारांची यादी..

  • 2026-01-16 09:30:00

    NMC Election Result 2026: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज घोषित होणार

    नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक 2025-26 साठी झालेल्या मतदानानंतर शहरातील 10 झोनमध्ये आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत शहरात 993 जण उमेदवार रिंगणात आहेत. यात 408 महिला उमेदवारांचा समावेश आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारीकडे 20 टेबल ईवीएम साठी तसेच पोस्टल बेलेट साठी 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक सहायक नियुक्त करण्यात आले आहे. हेही वाचा: Nagpur Municipal Election Result 2026 Live: 15 वर्षापासून शहरात भाजपचा महापौर, यावेळी परंपरा खंडित होणार?
  • 2026-01-16 09:20:00

    Mumbai Civic Body Election Result: BMC निवडणूक मतदानाची मतमोजणी विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार

    बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे.मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्‍यासह 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.
  • 2026-01-16 09:10:00

    BMC Election 2026 Result: एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीचे सरकार

    गुरुवारी झालेल्या बीएमसी निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होतील. त्याआधी, अ‍ॅक्सिस माय इंडिया आणि इतर एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की मुंबईत महायुती सत्तेत असेल. हेही वाचा: BMC Election 2026 Exit Poll: ठाकरे बंधूंना मोठा धक्का, बीएमसीमध्ये कमळच फुलणार; एक्झिट पोलवरून जाणून घ्या संपूर्ण समीकरण
  • 2026-01-16 09:00:17

    महापालिका निवडणुकीचा आज निकाल

    Live Municipal Election Result 2026 Updates: 15 जानेवारी रोजी राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचे नशिब इव्हीएममध्ये कैद झाले आहे. आज त्यांच्या निकाल लागणार आहे. या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट,