मुंबई. BMC Municipal Elections Result 2026 : बहुप्रतिक्षित राज्यातील 29 महापालिकांचे (Maharashtra Municipal Election Result) निकाल आज जाहीर झाले. यात सर्वात अधिक उत्सुकता मुंबई महापालिकेच्या निकालाकडे लागली होती. कारण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात होता. गेल्या २५ वर्षापासूनची उद्धव ठाकरे गटाची सत्ता भाजपने हिसकावून घेतली आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे.
भाजपने 96 जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे गट 61 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिंदेंच्या शिवसेने 26 जागांवर यश मिळवले तर काँग्रेस 21 जागांवर विजयी राहिली. मनसे 8 , अजित पवार व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १-१ तर एमआयएमसह अन्य पक्षांना 12 जागा मिळाल्या.
2017 च्या निवडणुकीत काय होती स्थिती? (Mahanagarpalika Nivadnuk Result 2026)
मागील वेळी 21 फेब्रुवारी 2017 रोजी या निवडणुका पार पडल्या होत्या. 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने 28.29 टक्के मतं मिळवली होती. मात्र त्यावेळी शिवसेना दुभंगलेली नव्हती. भाजपनेही जोरदार कामगिरी करत 27.35 टक्के मत घेत 82 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसनेही 31 नगरसेवक महापालिकेत पाठवले होते. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 15.94 होती. राष्ट्रवादी आणि मनसेला अनुक्रमे 9 आणि 7 जागां मिळाल्या होत्या. त्यानंतर मनसेचे नगरसेवक शिवसेनेत सामील झाले होते. समाजवादी पक्षानेही 6 जागांवर आणि एमआयएमने २ जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी ६ प्रभागात अपक्षांनी विजय मिळवला होता.
2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत एकूण 55.53 टक्के मतदान झालं होतं, यंदाही जवळपास तितकेच मतदान झाले आहे. आता राज्याला निकालाची प्रतीक्षा असून 16 जानेवारी 2026 हा दिवस मुंबई मनपासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
