जेएनएन, मुंबई. Live Municipal Election Result 2026 Updates: 15 जानेवारी रोजी राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचे नशिब इव्हीएममध्ये कैद झाले आहे. आज त्यांच्या निकाल लागणार आहे. राज्यातील 29 महापालिकेत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे.
‘हजारो लोकांची नावे मतदार यादीतून गायब’
बीएमसी निवडणुकांबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले, "मुंबईसारख्या शहरात ज्या प्रकारे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, ही एक गंभीर बाब आहे. ज्या भागांमध्ये शिवसेना (यूबीटी), मनसे किंवा काँग्रेसचे प्राबल्य आहे, त्या भागांतील हजारो लोकांची नावे मतदार यादीतून गायब आहेत, ज्यांनी विधानसभा निवडणुकीतही मतदान केले होते... ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत नाहीत... निवडणूक आयोग आमचे ऐकायला तयार नाही,” असा दावा त्यांनी केला.
#WATCH | Mumbai | On #BMCElections Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "The voting pattern that has been going on in a city like Mumbai is a serious matter. Names of thousands of people, who have even voted in the Assembly elections, are missing in areas where Shiv Sena… pic.twitter.com/BOnlxfFjqL
— ANI (@ANI) January 16, 2026
‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बैठक’
तसंच, ‘काल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बैठक झाली, का? आचारसंहिता अजूनही लागू आहे…’ असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "मतदानाची टक्केवारी येण्यापूर्वीच एक्झिट पोल आले... भाजपने विजय साजरा करायला सुरुवात केली... आम्ही लोकांना घाबरू नका असे आश्वासन दिले आहे..."
मुंबईत मतदानाचा टक्का घसरला
BMC Election Results Live: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 52.94 टक्के मतदान झाले, जे 2017 मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत 55.53 टक्के होते, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदान कमी झाले आहे.
