मुंबई. Aimim Winning Candidate list: मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल आज सकाळपासून जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून राज्यातील 29 पैकी 21 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपच्या वादळात अन्य मातब्बर पक्षांची धुळधाण होत असताना महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीनं ओवैसी यांच्या एमआयएमनं महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आहे.  एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. पक्षाचे 29 पैकी 13 महापालिकेत 95 उमेदवार विजयी झाले आहेत.

एमआयएमने अबु आझमींच्या समाजवादी पक्षाचे वर्चस्व असलेल्या मुंबईतही चांगलीच मुसंडी मारली आहे. मानखुर्दमध्ये एमआयएम पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. मुस्लिमबहुल भागात एमआयएम विजयी झाल्याने मुंबईतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता उखडून टाकण्यात भाजपला यश आले आहे. मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच महापौर होणार आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांत ओवैसींच्या एमआयएमने अनपेक्षित कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमआयएमने 13 महापालिकांमध्ये 95 जागा जिंकत आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. एमआयएमने छत्रपती संभाजीनगर, मालेगाव तसेच सोलापूरमध्येही नेत्रदीपक यश मिळवले आहे. मुंबईतही एमआयएमचे सहा नगरसेवक महापालिकेत गेले आहे. 

मराठवाड्यातील संभाजीनगर, नांदेड, जालना, विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर तर उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, धुळ्यातील मुस्लिम बहुल परिसरातील मतदारांनी एमआयएमच्या बाजुने कौल दिला आहे. 

मुंबईतील एमआयएमच्या विजयी उमेदवारांची यादी

    प्रभाग 134- मेहजबिन खान - एमआयएम

    प्रभाग 136- जमीर कुरेशी - एमआयएम

    प्रभाग 137- समीर पटेल- एमआयएम

    प्रभाग 138- रोशन शेख- एमआयएम

    प्रभाग 139- शबाना शेख- एमआयएम

    प्रभाग 145- खैरुनिसा हुसेन- एमआयएम

    एमआयएमने कोणत्या महापालिकेत किती जागा जिंकल्या?

    छत्रपती संभाजीनगर महापालिका- 26

    मालेगाव महापालिका- 20

    सोलापूर महापालिका- 08

    धुळे महापालिका- 08

    नांदेड महापालिका- 08

    मुंबई महापालिका- 06

    अमरावती महापालिका- 06

    ठाणे महापालिका- 05

    नागपूर महापालिका- 04

    जालना महापालिका- 02

    चंद्रपूर महापालिका- 01

    अकोला महापालिका- 03