नाशिक. Nashik NMC Mahapalika Nivadnuk Result 2026 : नाशिक महापालिकेच्या एकूण 122 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 31 प्रभागात 122 नगरसेवक निवडले गेले. नाशिक (Nashik NMC Election Result) महानगरपालिकेमध्ये एकूण 122 प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडला जाणार आहे. या महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला वा आघाडीला 61 किंवा त्याहून अधिक जागांची आवश्यकता आहे.
नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता-
नाशिकमध्ये भाजपने 66 शिवसेना शिंदे गटाने 21 राष्ट्रवादी काँग्रेस 3 शिवसेना उद्धव ठाकरे 8 तर मनसेने 1 जागा जिंकली आहे.
कोणत्या मुद्द्यावर गाजली निवडणूक (Nashik Municipal Election Result)-
या भागात 2026 मधील महानगरपालिका निवडणुका अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे अत्यंत निर्णायक ठरली. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, नागरी सुविधा आणि एकूणच शहरी प्रशासन या विषयांवर मतदारांचे लक्ष केंद्रित होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नांवर कोणत्या पक्षाने किंवा उमेदवाराने काय उपाययोजना मांडल्या? या बाबी मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या.
2017 मध्ये कोणाला किती जागा?
महानगरपालिकेमध्ये 2017 साली म्हणजेच जवळपास 8वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 64 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. शिवसेनेला 32 जागा मिळाल्या होत्या तर अन्य 8 जागा निवडून आल्या होत्या. यावेळच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
