जेएनएन, जळगाव. आज राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत दिसत आहे. अशातच जळगावमध्ये एक अनोखा विजय झाला आहे. कोल्हे कुटुंबातील तिघेजण विजयी झाले आहेत, त्यातील एकाने तर जेलमधून निवडणूक लढवली होती.
कोल्हे कुटुंबातील तिघेजण विजयी
जळगावमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट संघर्ष सुरु होता. यामध्ये आता माजी महापौर थेट जेलमधून निवडून आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघेजण विजयी झाले होते. ललित कोल्हे, पियुष कोल्हे अन् सिंधू कोल्हे विजयी झाले आहेत.
पियुष कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली होती
लिलत कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक 11मधून निवडणूक लढवली होती.
त्यांच्याच कुटुंबातील सिंधू कोल्हे यांनीही विजय मिळवला आहे. पिता-पुत्राचा विजय शिवसेना शिंदे गटाचे नेते सरिता कोल्हे यांचे आनंदाश्रू अनावर झाले आहेत.
#WATCH | Maharashtra civic body elections | Jalgaon: Mahayuti candidates Sindhutai Kolhe and Piyush Lalit Kolhe share a hug and break down in an emotional moment, as they win ward 11.
— ANI (@ANI) January 16, 2026
Three members of the family - Lalit Kolhe, Sindhutai Kolhe and Piyush Lalit Kolhe won the… pic.twitter.com/CYT2HcoIn3
15 जानेवारी रोजी राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचे नशिब इव्हीएममध्ये कैद झाले आहे. आज त्यांच्या निकाल लागणार आहे. राज्यातील 29 महापालिकेत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे.
