जेएनएन, मुंबई. राज्यात 29 महानगर पालिकांमध्ये काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. मात्र त्यांना या निवडणुकीत विशेष असे यश मिळाले नाही.

उद्धव ठाकरे सेना अपयशी?

BMC Election 2026: मुंबईसह राज्यातील निवडणुकीचे एक आकर्षण होते, ते म्हणजे ठाकरे बंधूंची बहुप्रतिक्षित युती. या निवडणुकांसाठी उद्धव सेनेने काही ठिकाणी मनसेसोबत युती केली होती. मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव ठाकरे सेनेला केवळ 2 महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले.

गेल्या 25 वर्षांचा उद्धव सेनेचा बालेकिल्ला कोसळला आहे. बीएमसीवर यंदा भाजपचा महापौर बसू शकतो. ही बाब इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. 

उद्धव ठाकरे यांचे कोणत्या महापालिकेत किती उमेदवार झाले विजयी/ आघाडीवर

  • मुंबई - 57
  • पुणे - 0
  • नागपूर - 1
  • छत्रपती-संभाजी-नगर - 6
  • पिंपरी-चिंचवड - 0
  • ठाणे - 1
  • नाशिक - 9
  • नवी-मुंबई - 0
  • कल्याण-डोंबिवली - 8
  • कोल्हापूर - 1
  • सांगली-मिरज-कुपवाड - 0
  • सोलापूर - 0
  • लातूर - 0
  • अहिल्यानंगर - 1
  • अमरावती - 1
  • नांदेड-वाघाळा - 0
  • जळगाव - 5
  • जालना - 0
  • चंद्रपूर - 6
  • वसई-विरार - 0
  • मालेगाव - 0
  • अकोला - 5
  • पनवेल - 5
  • मीरा-भाईंदर - 0
  • धुळे - 0
  • परभणी - 24
  • उल्हासनगर - 0
  • भिवंडी-निजामपूर - 0
  • इचलकरंजी - 0

हेही वाचा - BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेत 25 वर्षानंतर सत्तापालट.. सर्वात श्रीमंत महापालिकेच्या चाव्या भाजपाकडे, ठाकरेंना मोठा धक्का