पुणे. Pune PMC Election Result : पुणे महापालिकेच्या एकूण 165 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. (Pune PMC Mahapalika Nivadnuk Result 2026) मतदानाच्या आधीच प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबागमधून भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने आता प्रभाग 1 ते 41 मध्ये एकूण 163 जागासाठी 1 हजार 165 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात आहेत. त्यातील अनेक लढती हाय-व्होल्टेज असून याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अजित पवारांना धक्का

पुण्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारली असून सत्तेकडे आगेकूच केली आहे. एकूण 165 जागांपैकी भाजप ९७ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांचे केवळ ६ उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच तसेच काँग्रेसची ६ जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर शरद पवार गटाचे २ उमेदवार आघाडीवर आहेत. येथे शिंदे सेना, मनसे व ठाकरे गटाला एकही जागा मिळालेली नाही.

पुण्यात कोणाला किती जागा?

भाजप - 96

राष्ट्रवादी अजित पवार गट - 6

    काँग्रस -6

    राष्ट्रवादी शरद पवार गट -3

    ठाकरे गट - 0

    मनसे -0

    शिंदे सेना -0

    पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. त्यासाठी 1,165 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील. यातील 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. 

    पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडली तर दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे. 

    2017 च्या निवडणुकीत कोणाला किती जागा?

    2017 च्या निवडणुकीत भाजप 94, राष्ट्रवादी काँग्रेस - 40, शिवसेना - 10, काँग्रेस - 11, मनसे – 2 आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. यावेळीही राष्ट्रवादी व भाजपमध्ये अटीतटीचा सामना होत आहे. 

    सायंकाळी 4 पर्यंत चित्र स्पष्ट होणार -

    पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र उमेदवारांची वाढलेली संख्या, प्रत्येक प्रभागासाठी लावण्यात आलेली टेबल व्यवस्था आणि मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांमुळे अखेरच्या प्रभागाचा निकाल लागण्यास रात्रीचे 10 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मतमोजणीसाठी 15 केंद्रांवर एकूण 335 मतमोजणी टेबल ठेवण्यात आले आहेत. 

    पुण्यातील तुळ्यबळ लढती -

    • रूपाली ठोंबरे-पाटील Vs स्वप्नाली नितीन पंडित
    • गणेश बिडकर Vs प्रणव धंगेकर 
    • योगेश मुळीक Vs  संदीप जहऱ्हाड
    • रेशमा भोसले Vs  नीलेश निकम
    • सनी निम्हण Vs प्रकाश ढोरे
    • अमोल बालवडकर Vs लहू बालवडकर
    • सोनाली आंदेकर Vs अनुराधा मंचे
    • लक्ष्मी आंदेकर Vs   ऋतुजा गडाळे
    • बाबूराव चांदेरे Vs गणेश कळमकर
    • जयश्री मारणे Vs रूपाली पवार 
    • दिलीप वेडे-पाटील Vs शंकर केमसे
    • हर्षवर्धन मानकर Vs अजय मारणे 
    • निवेदिता एकबोटे  Vs दीपक (बाळासाहेब) बोडके
    • श्रीनाथ भिमाले Vs अक्षय जैन 
    • अरविंद शिंदे Vs सोनू निकाळजे
    • सुजाता शिंदे Vs उज्ज्वला यादव
    • अजय खेडकर  Vs विजय ढेरे
    • धीरज घाटे  Vs अशोक हरणावळ
    • धनंजय जाधव Vs अमर आवळे