Zilla Parishad Election 2026 Results Highlights: पुणे, सोलापूर, धाराशिवसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असणाऱ्या 125 पंचायत समितीसाठी मतदान झाले आहे. या मतदानाची मतमोजणी होत आहे. (Maharashtra Zilla Parishad Election Result Highlights Updates)
राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले असून आज मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात (Panchayat Samiti Election 2026 Results) झाली आहे. एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे.
हेही वाचा - ZP Election Result 2026: 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल, कोण मारणार बाजी
- 2026-02-09 17:49:07
Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले…
पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून कफचा (खोकल्याचा) त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे, अशी माहिती (Sharad Pawar Health Update) त्यांनी दिली.
सविस्तर वाचा - - 2026-02-09 17:07:02
Latur ZP Election Result: नणंद विरुद्ध भावजयीचा रंगला सामना! अवघ्या 2 मतांनी दिली धोबीपछाड
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये ही अटीतटीची लढत झाली आहे. या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांचीच भावजय सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे.
- 2026-02-09 17:05:55
Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांच्या नातेवाईकांचा पराभव
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. या जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांच्या नातेवाईकांना पराभव स्विकारावा लागला आहे.
- 2026-02-09 16:31:19
zp election in maharashtra 2026 result: वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे मयुरी बागल विजयी
वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे मयुरी बागल विजयी - 2026-02-09 16:29:02
आटपाडी जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी
आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी - 2026-02-09 16:09:03
कोलगाव जिल्हा परिषद गटात अपक्ष मायकल डिसोझा विजयी
सिंधुदुर्गातील कोलगाव जिल्हा परिषद गटात झालेल्या भाजपाला धक्का बसला आहे. कोलगाव जिल्हा परिषद गटात अपक्ष मायकल डिसोझा विजयी - 2026-02-09 15:59:27
परभणीच्या बोबडे टाकळी जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेच्या सुचिता आनंद भरोसे 1208 मतांनी विजयी
परभणीच्या बोबडे टाकळी जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेच्या सुचिता आनंद भरोसे 1208 मतांनी विजयी - 2026-02-09 15:57:07
पारगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या स्वाती तळेकर 1700 मतांनी विजयी
पारगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या स्वाती तळेकर 1700 मतांनी विजयी - 2026-02-09 15:57:09
कळंब तालुक्यातील खामसवाडी गटात भाजपाचे विश्वास कोकणे विजयी
कळंब तालुक्यातील खामसवाडी गटात भाजपाचे विश्वास कोकणे विजयी - 2026-02-09 15:54:24
zp election result news: शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी - 2026-02-09 15:54:20
zp election result 2026: जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी
कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी - 2026-02-09 15:54:17
zp election result News: भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी
भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी - 2026-02-09 15:37:28
Kagal zp election result: कागल तालुक्यातील नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले विजयी
कागल तालुक्यातील नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले विजयी - 2026-02-09 14:16:51
Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आघाडी
Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असून अनेक तालुक्यांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून काही ठिकाणी महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत.
- 2026-02-09 14:02:23
रायगडमध्ये मतमोजणीवेळी राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु होता. पोलिसांनी सूचना देऊन सुद्धा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केले आहे. - 2026-02-09 13:56:56
रायगड जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Raigad ZP Election Result Winner List)
रायगड जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Raigad ZP Election Result Winner List)- विकास गोगावले (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी
- मानसी दळवी (शिवसेना)- थळ गटातून विजयी
- अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)- शहापूर जिल्हा परिषद गट (अलिबाग)
- दिलीप भोईर (शिवसेना)- आवास जिल्हा परिषद गट अलिबाग
- रसिका केणी (शिवसेना)- आंबेपूर जिल्हा परिषद गट
- मन्सुर ताज (शिवसेना)- दासगाव जिल्हा परिषद मतदार संघ (महाड)
- गीता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)- चरई खुर्द (तळा तालुका)
- नलिनी लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)- रहाटाड (तळा तालुका)
- 2026-02-09 13:55:56
ZP Election Result 2026 Winner List: राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर
Zilla Parishad Election Result 2026 Winner List: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर सविस्तर वाचा - - 2026-02-09 13:12:50
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे
पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे (Pune Mayor Manjusha Nagpure) तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या निवड करण्यात आली आहे. सविस्तर वाचा - - 2026-02-09 12:33:25
Kolhapur Zilla Parishad 2026 Results Live : कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल
कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल (बारावाजेपर्यंतचे चित्र) कोल्हापूर जिल्हा परिषद एकूण जागा - 68 भाजप - 8 शिवसेना (शिंदे) - 7 राष्ट्रवादी - 10 काँग्रेस - 12 शिवसेना (ठाकरे) - 2 जनसुराज्य - 4 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1 - 2026-02-09 12:29:09
जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीवरील पक्ष
जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीवरील पक्ष (दुपारी 12 वाजेपर्यंतजागानिहाय)- भाजपा- 145,
- शिवसेना- 90,
- राष्ट्रवादी- 82,
- काँग्रेस - 29,
- ठाकरे सेना- 20,
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-07
- 2026-02-09 11:43:19
ZP Election Results: ठाकरे गटाचे अमर समुद्रे 1 मताने विजयी
ढोकी पंचायत समितीतून अमर समुद्रे 1 मताने विजयी झाले आहेत. सविस्तर वाचा - - 2026-02-09 11:36:45
Sangli ZP Election Result 2026: सांगलीत काँग्रेसने उघडले खाते
सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे. कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश महेंद्र लाड विजयी झाले आहेत. - 2026-02-09 11:31:42
Jilha Parishad Election 2026: शरद पवार गटाने खोललं खाते
राष्ट्रवादी शरद पवार गटाने खाते खोललं आहे. खंडाळी गटातून शरद पवार गटाच्या खोमणे शितल विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या रेखा हाके यांचा पराभव केला आहे. - 2026-02-09 11:27:24
zp election in maharashtra 2026: आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का, मुलाचा दारूण पराभव
माळशिरस मध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी जानकर यांच्या मुलाचा अकराशे मतांनी पराभव झाले आहेत. - 2026-02-09 11:23:33
राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी मारली बाजी
शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी मारली बाजी - 2026-02-09 10:39:55
पहिला निकाल हाती आला भाजपचे राजेश जाधव विजयी
Zilla Parishad Election Result LIVE: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असून भाजपचे राजेश जाधव विजयी झाले आहेत. पंचायत समितीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी झालाय. सविस्तर वाचा - - 2026-02-09 10:25:55
ZP ELection Result 2026: धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ
धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला आहे. उमेदवार प्रतिनिधीलाही आतमध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रतिनिधी तासाभरापासून गेटवरच अडवले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत, उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आरोप केला आहे. - 2026-02-09 10:28:06
ZP Election Result LIVE: मतमोजणीला सुरुवात
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. - 2026-02-09 09:58:30
अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही राज्याच्या विकासासाठी आणि सार्वजनिक कल्याणासाठी सतत प्रशंसनीय कार्य करत आहात. भगवान गणेश तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, असं त्यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। प्रदेश के विकास और जनकल्याण की दिशा में आप निरंतर सराहनीय कार्य कर रहे हैं। गणपति बाप्पा आपको उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु प्रदान करें।
— Amit Shah (@AmitShah) February 9, 2026 - 2026-02-09 09:37:55
अल्पवयीन मुलाचा बालहट्ट पुरवणे पडले महागात
शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केंद्रात घुसून बोटाला शाई लावल्याप्रकरणी तीन निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे ही घटना घडली, ज्यामुळे मतदान प्रक्रियेची गुप्तता भंग झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
- 2026-02-09 09:36:51
कोण मारणार बाजी
मिनी विधानसभेत कोण मारणार बाजी? वाचा सविस्तर - 2026-02-09 09:00:56
कोणत्या जिल्हा परिषदेत किती झालं मतदान
कोणत्या जिल्हा परिषदेत किती झालं मतदान- रायगड 69.91%
- रत्नागिरी 55.79 %
- सिंधुदुर्ग 61.98 %
- पुणे 68.35 %
- सातारा 67.80 %
- सांगली 69.76 %
- सोलापूर 65.90 %
- कोल्हापूर 74.45 %
- छत्रपती संभाजीनगर 72.69 %
- परभणी 74.89 %
- धाराशिव 65.22 %
- लातूर 63.79 %

- 2026-02-09 08:49:00
ZP ELection Result 2026: 7438 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे. 731 जिल्हा परिषद गट आणि 1462 पंचायत समिती गणांसाठी रिंगणात असलेल्या तब्बल 7438 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. - 2026-02-09 08:15:59
मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई
मुंबई: मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. - 2026-02-09 08:13:10
Live ZP Polls Result 2026: आज मतमोजणी
Live ZP Polls Result 2026 Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले असून आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10.30 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे.
