जेएनएन, मुंबई. Zilla Parishad Election Result: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. या जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांच्या नातेवाईकांना पराभव स्विकारावा लागला आहे.

निवडणुकीत दिग्गजांच्या नातेवाईकांना पराभव 

  • माजी मंत्री लक्ष्मण ढोबळी यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. 
  • माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याला ही पराभवाचा धक्का बसला आहे. 
  • माजी मंत्री सुरेश वडपुरकर यांच्या घरातील चार जणांचा पराभव झाला आहे. 
  • रत्नागिरीत माजी आमदार सुभाष बने यांच्या मुलाचा ही पराभव झाला आहे. 
  • सोलापूरमध्ये माजी आमदार दीपक सोळुंके यांच्या मुलाला ही पराभवाचा धक्का बसला आहे. 
  • विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा ही सोलापूरमध्ये पराभूत झाला आहे. 
  • कोल्हापुरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव
  • माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मोठा धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी

हेही वाचा - ZP Election Result 2026 Winner List: राज्यातील 12 जिल्हा परिषदेतील 731 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा सविस्तर एका क्लिकवर