जेएनएन, पुणे. पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 65 जागांचे निकाल हाती आले असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तब्बल 40 पेक्षा अधिक जागा जांगावर निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला 8, शिवसेनाला 5, ठाकरे गटाला 7 तर शरद पवार गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मात्र एकही जागा मिळालेली नाही, अपक्षांचाही खातं उघडलेलं नाही. या निकालांमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचं वर्चस्व अधिक ठळक झालं असून, सत्तास्थापनेचा मार्ग आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
भाजप दुसऱ्या क्रमांकावर
सुरुवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असून अनेक तालुक्यांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून काही ठिकाणी महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेस पिछाडीवर
शिवसेना (ठाकरे गट)नेही खाते उघडत स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
