जेएनएन, मुंबई. ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असून भाजपचे राजेश जाधव विजयी झाले आहेत. पंचायत समितीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला.

ZP Polls Result 2026 Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले असून आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10.30 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे.