जेएनएन, मुंबई. Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) दाखल करण्यात आला आहे. सध्या ते तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पवार सध्या कोणाशीही संवाद साधू शकत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

शरद पवारांची प्रकृती कशी आहे?

रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून कफचा (खोकल्याचा) त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. 

शरद पवार सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत - डॉक्टर डॉ. अभिजीत लोढा 

पुढे बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासलेली नाही. ते सध्या रुग्णालयातील एका खाजगी रूममध्ये विश्रांती घेत आहेत. ते सध्या सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.