जेएनएन, पुणे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे (Pune Mayor Manjusha Nagpure) तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या निवड करण्यात आली आहे.
निवडणूक केवळ औपचारिक
महानगरपालिकेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने निवडणूक केवळ औपचारिक ठरली आहे. तरीही या निवडीकडे पुणेकरांचं लक्ष्य लागले होते.
मंजुषा नागपुरे यांच्यासमोर मोठी आव्हानं
महापौरपदी निवड होणाऱ्या मंजुषा नागपुरे यांच्यासमोर शहरातील वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांसारखी मोठी आव्हानं असणार आहेत. तर उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यावर प्रशासन आणि सभागृहातील कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी असणार आहे.
महापौर निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची
दरम्यान, मनपात सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय समीकरणं लक्षवेधी ठरत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महापौर निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. महापौर निवडीनंतर पुणे महानगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Pune, Maharashtra: BJP candidate Manjusha Nagpure was elected mayor and Parshuram Wadekar deputy mayor of Pune unopposed pic.twitter.com/WLb8HpwagZ
— IANS (@ians_india) February 9, 2026
हेही वाचा - ZP Election Result 2026: राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला मिळाल्या किती जागा? हा पक्ष ठरला अव्वल
