जेएनएन, मुंबई. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. या सर्व निकालात सध्या एकाच निकालाची चर्चा होत आहे. तो म्हणचे धाराशिव जिल्ह्यातील ठोकी पंचायत समिती गणाचा निकाल.

उद्धव ठाकरे गटाचे अमर समुद्रे विजयी

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणात सर्वात थरारक लढत पाहायला मिळाली आहे. येथील भाजप उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे अमर समुद्रे (Amar Samudre) यांनी निसटता पण ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

मतमोजणीअंती उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांना 3187 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना 3186 मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने ठाकरे गटाने गुलाल उधळला आहे. निहाल काझी यांना मिळालेल्या या पराभवाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

धाराशिव तालुक्यातील ढोकी जिल्हा परिषद गटात एकूण 20,103  मतदारांपैकी 12,789 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या पैकी ढोकी पंचायत समितीच्या गणात एकूण 7,967 मतदान झाले होते. यातील ढोकी येथील 5 प्रभागांतील 10,979 मतदारांपैकी 7,193 जणांनी मतदान केले.