जेएनएन, मुंबई. Zilla Parishad Election 2026 Result: पुणे, सोलापूर, धाराशिवसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असणाऱ्या 125 पंचायत समितीसाठी मतदान झाले आहे. या मतदानाची मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Zilla Parishad election Result live updates)
राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले असून आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10.30 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात (Panchayat Samiti Election 2026 Results) होणार आहे. एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे.
कोणत्या जिल्हा परिषदेत किती झालं मतदान
- रायगड 69.91%
- रत्नागिरी 55.79 %
- सिंधुदुर्ग 61.98 %
- पुणे 68.35 %
- सातारा 67.80 %
- सांगली 69.76 %
- सोलापूर 65.90 %
- कोल्हापूर 74.45 %
- छत्रपती संभाजीनगर 72.69 %
- परभणी 74.89 %
- धाराशिव 65.22 %
- लातूर 63.79 %

