उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) भारतीय राजकारणी असून 2019 ते 2022 दरम्यान त्यांनी राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. कोरोना साथीत राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 2003 साली शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. 2020 पासून उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यापासून उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आहेत.