जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray Dasara Melava 2025 : राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी सरकारची अद्याप मदत पोहोचलेली नाही. तोंडावर दसरा दिवाळी हे सण आहेत. अन् यातच शेतकऱ्यांच्या तोंडाचा हास हिरवला आहे. आता दसरा म्हटले की राजकीय वातावरणही पेटायला सुरुवात होते. कारण महाराष्ट्र उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. या सर्वांमध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा खास होऊ शकतो. तो कसा चला जाणून घेऊया…
मेळाव्यात राज ठाकरे हजेरी लावणार?
दसरा मेळाव्यानिमित्त 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंसाठी खास असणार आहे. कारण 20 वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू हे एका मंचावर आले होते. मराठीच्या मुद्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. त्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे हजेरी लावणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
BMC निवडणूक
येत्या काही दिवसांत मुंबई बृन्हमहानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करुन ठाकरे दसरा मेळाव्यात आपल्या तोफेतून कशाप्रकारे प्रशासनावर प्रहार करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल, दरम्यान, मागील काही दिवसांपासून पालिकेकडून सुरु असलेल्या कामांवर आणि पावसाळ्यात मुंबईची झालेली दाणादाण याचा ठाकरे कसा समाचार घेतात. यावरही सर्वांचे लक्ष लागून आहे. तसंच, निवडणुकीसाठी ठाकरे मुंबईकरांना काय साद घालतात याकडे सर्वांची नजर असेल.
राज ठाकरेंसोबत युती?
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यातच, जवळच्याच काळात ठाकरे यांचे तीन वेळा मिलन झाले आहे. पहिल्यांदा ठाकरे हे मराठी विजयाच्या सभेत व्यासपीठावर भेटले होते. त्यानंतर उद्धव हे राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे आणि ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे. या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यावर काही बोलणार का? याची मनसैनिक आणि शिवसैनिक आतूरतेने वाट पाहत आहेत.
शिवसेनेचा टीझर जारी
'शिवतीर्थ साक्ष देतंय… हिंदुत्वाच्या हुंकाराची महाराष्ट्र रक्षणाच्या शपथेची नव्या दमाच्या ठिणगीची! ही साक्ष नव्याने अनुभवायला या! दसरा मेळावा 2025 विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा!' असं शिर्षकासह टीझर जाहीर करण्यात आला आहे. यातून शिंदे सेनेला डिवचण्याचे काम करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे नाराजी?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. अशी मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे हे अनेकदा महत्त्वाच्या वेळी आपल्या मुळ दरे गावी गेले होते. त्यामुळे शिंदे नाराज आहेत, अशी चर्चा माध्यमात होती. त्यावरुन उद्धव ठाकरे हे शिंदेंना लक्ष्य करु शकतात. ॉ
हेही वाचा - Shivsena UBT Dasara Melava: 63 कोटींचा दसरा मेळावा; उबाठासाठी '9' अंकांचं खास कनेक्शन..! भाजपचा दावा
मराठवाडा महापूर
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. विशेषत: मराठवाड्याला पावसाने धुवून काढले आहे. इथं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. धाराशीव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही अद्याप सरकारची कोणतीही मदत सरकारने शेतकऱ्यांनी दिली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर आपली तोफ डागू शकतात.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा दसरा मेळावा कधी आणि कुठे होणार आहे?
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे. जानेवारी 2025 मध्ये बीएमसीकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि नऊ महिन्यांनंतर परवानगी मिळाली आहे.