जेएनएन, मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेनांच्या दसरा मेळाव्याला फक्त तीन दिवस उरले आहेत. पावसाचे सावट आणि शिवाजी पार्कवरील चिखल असूनही उद्धव ठाकरे गटाने यंदाचा दसरा मेळावा (Dussehra Rally) शिवतीर्थावरच घेण्याचा निर्णय पक्का केला आहे.

शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचे आयोजन

पावसामुळे मैदानावर चिखल झालेले असले तरी उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) हार न मानता मेळावा शिवतीर्थावरच घेण्याचे ठरवले. पक्षाच्या नेत्यांची मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वपूर्ण बैठक पार 

कालच सेना भवन येथे मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. कुठल्याही परिस्थितीत मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना नेत्यानी दिली आहे.

दसरा मेळाव्याची तयारीला सुरुवात

    आज दुपारपासूनच मैदानावरील कामांना गती देण्यात येणार आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेनाकडून विशेष पथकं तयार केली आहे. पावसामुळे मोठी गर्दी सांभाळण्याचं आव्हान असलं तरी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मात्र कायम आहे.

    मुंबई पोलीस ही तयार

    उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळावासाठी मुंबई पोलिस पूर्णपणे सज्ज झाली आहे. शिवाजी पार्कमधील सुरक्षा व्यवस्थायची तपासणी आजपासून केली जाणार आहे. ट्राफिकची व्यवस्था बाबत नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. मेळाव्याच्या दिवशी अनुचित घटना घडणार नाही यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त करण्यात येणार आहे.