जेएनएन, मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) बंधूंच्या संभाव्य युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चां होत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येऊन लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीबाबत ही भाष्य केले आहे.
काय म्हणाले शरद पवार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ठाकरे बंधू एकत्र आले आणि मुंबईत सत्तेत आले, तर मला आनंद होईल. युतीबाबतच्या चर्चांना आता गांभीर्य आले आहे. या युतीचे गंभीर परिणाम आगामी निवडणुकीवर नक्कीच दिसणार आहे.
मविआवर परिणाम?
ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकते? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला यावेळी, प्रत्येक राजकीय पक्ष आपला निर्णय घेतो. जर ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्यांचं स्वागत आहे. त्याचा मविआवर काय परिणाम होईल, हे परिस्थितीवर अवलंबून असणार आहे, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात येत्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत आहे. निवडणुकीस शंभर दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाला सज्ज राहण्याच्या स्पष्ट सूचना दिले आहे. मनसेसोबत युती करायची की नाही, हा निर्णय आम्ही वरच्या पातळीवर घेऊ, पण तुम्ही तयारीला लागा, असे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.