मुंबई. Uddhav Thackeray Dasara Melava Speech : भरपावसात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा ते नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. बाप देशप्रेमाचं नाटक करत असून पोरगं पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतंय असं म्हणत शहा पुत्रांवर निशाणा साधला तर मणिपूरला गेल्यानंतर मोदींना मणी दिसला, पण तिथल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू मात्र दिसले नाहीत. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्रद्वेषामुळे मदत करत नसल्याचा आरोप ठाकरेंनी केला.

ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

Uddhav Thackeray Dasara Melava Speech : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं असतं, त्यामुळेच अनेक पक्षांचं आपली शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. 
  • मुंबईच्या रस्त्यांची चाळण झालीय. मेट्रो स्टेशन तुंबतंय. मोनो रेल्वे लटकतेय, रस्त्यात खड्डे पडताहेत आणि हे मुंबई महापालिकेत आपला महापौर झालाच पाहिजे म्हणत बोंबलत अमित शहा दिल्लीला जाताहेत
  • वाघाचं कातडं पाघंरलेला लांडगा माहिती होता मात्र बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र आज पहिल्यांदाच पाहिलं. गाढवावरती कितीही शाली टाका ते गाढव ते गाढवच, त्याला अमित शहांच्या जोड्यांचा भारच वाहायचा आहे. 
  • देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत मी मुख्यमंत्री असताना पहिल्या क्रमाकांवर होतो. आता देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमाकांवर आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पहिल्या नंबरवर आले आहेत.
  • मणिपूरला जाऊन मोदींना त्या नावातला मणी दिसतो मात्र तेथील लोकांच्या डोळ्यातील पाणी पाणी दिसत नाही. केवळ महाराष्ट्र द्वेषामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. 
  • मराठी द्वेष्ट्यांना सांगतोय माझ्या मराठीला हात लावून दाखवा तुमचे हात जाग्यावर ठेवणार नाही.
  • भाजपला सांगतोय आमच्या हिंदुत्वावर येऊ नका, नाहीतर तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोंचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही.
  • मुंबई महापालिकेची निवडणूक घेतील असं वाचत नाही. कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्यादिवशी यांनी तीन वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी जनतेसमोर येईल.आम्ही त्याच्यावर व्हाईट पेपर काढणार.
  • लोकांना वाटलं पाहिजे माझा रक्षणकर्ता हा बाळासाहेबांचा भगवा हातात घेतलेला शिवसैनिक आहे, भगवी शाल पांघरलेला गाढव नाही.
  • मोदींनी २०१४ साली सुरू केली होती चाय पे चर्चा. तिथुनच सुरु करा २०१४ साली चहाची किंमत काय होती आणि आज काय आहे.
  • मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई जर व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
  • धर्म विचारून हिंदूंना मारणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता, म्हणजे बाप देशप्रेमाचं ढोंग करतो आणि पोरगं पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतं ही तुमची घराणेशाही.
  • मोदींना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव करायचा आहे. या जीएसटी कुणी लावला होता, नेहरूंनी लावला होता का? आठ वर्षे यांनी लोकांना लुटलं, आता महोत्सव साजरा करत आहेत.
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी आम्ही सगळं विसरून एकत्र येणार. मी त्याचवेळी सांगितलं होतं आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठीच.

हे ही वाचा -Shiv Sena Dasara Melava 2025 : गाढव ते गाढवच! कितीही भगवी शाल..; शहांच्या जोड्यांचा भार, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जहरी वार