राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील महिलांचे स्थान बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू केली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, ही या योजनेची अट आहे. नुकतेच या योजनेची वर्षपूर्वी झाली.