जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC  करावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊया की, लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी कशी करायची हे Video च्या माध्यमातून जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेची eKYC कशी करावी (How to do eKYC for Ladki Bhain Yojana)

  • मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची eKYC करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
  • या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
  • यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
  • * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासा

  • * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
  • जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
  • यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

जात प्रवर्ग निवडावा

  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
    1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
  • वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, आता eKYC करणे अनिवार्य

या महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

    • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
    • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
    • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
    • तथापि, रु. 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. 
    • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु.1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
    • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
    • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
    • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

    या नियमानुसार, योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही वरील नियमापैकी एकाही नियमात बसल असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल.