जेएनएन, मुंबई. महायुती सरकारने राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू आहे. या योजनेचे लाभार्थी हे दोन कोटीपेक्षा अधिक महिला आहे. मात्र या योजनेत शासनाचीच फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पात्र नसताना आणि सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. 

8 हजारांहून अधिक महिलांनी केली फसवणूक

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजारांहून अधिक झाली आहे, अशी माहिती समोर येत आहे. या फसव्या बहिणींवर सरकारकडून अॅक्शन घेण्यात येणार आहे.

15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश

या सर्वांकडून मिळालेला लाभ परत घेण्यासाठी शासन कठोर पाऊलं उचलणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेशही शासनाकडून देण्यात आले आहेत.

केवायसी केली अनिवार्य

    लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC  करावी लागणार आहे.

    • मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची eKYC करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
    • मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
    • या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
    • यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
    • * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

    सविस्तर वाचा - Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची eKYC कशी कराल… Video च्या माध्यमातून पाहा सोपी पद्धत