जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटकरुन महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC  करावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊया की, लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी कशी करायची

ई-केवायसी प्रोसेस कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process)

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी 

https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

    यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

    * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

    * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

    जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

    यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

    त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

    1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

    2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

    वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

    शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

    मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.

    ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.’  

    ई-केवायसी (e-KYC) करण्याची प्रक्रिया: (How to do e-KYC Ladki Bahin Yojana)

    पोर्टलवर लॉगिन: 

    सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

    अर्ज भरा: 

    लॉग इन केल्यानंतर, "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज" या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.

    आधार आधारित पडताळणी: 

    त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्यात तुमचा आधार क्रमांक वापरून तुमची ओळख पडताळली जाईल.

    नारीशक्ती ॲप वापरूनही प्रक्रिया: 

    काही लाभार्थ्यांनी नारीशक्ती ॲपचा वापर करून अर्ज भरले आहेत. त्यांनाही ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

    ladki-bahin-yojana-ekyc मराठी

    लाडकी बहिण योजनेचे निकष काय आहेत

    • लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
    • दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे 
    • ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
    • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
    • लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
    • नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
    • अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
    • अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
    • नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.

    हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, आता eKYC करणे अनिवार्य