जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटकरुन महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC करावी लागणा आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.’
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/gBViSYZxcm या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत…
ई-केवायसी (e-KYC) करण्याची प्रक्रिया: (How to do eKYC Ladki Bahin Yojana)
पोर्टलवर लॉगिन:
सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
अर्ज भरा:
लॉग इन केल्यानंतर, "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज" या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
आधार आधारित पडताळणी:
त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्यात तुमचा आधार क्रमांक वापरून तुमची ओळख पडताळली जाईल.
नारीशक्ती ॲप वापरूनही प्रक्रिया:
काही लाभार्थ्यांनी नारीशक्ती ॲपचा वापर करून अर्ज भरले आहेत. त्यांनाही ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

लाडकी बहिण योजनेचे निकष काय आहेत
लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.

लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे काय आहेत
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.
जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.