जेएनएन, मुंबई. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. महिला लाभार्थी वर्गातून सुमारे 26 लाख 34 हजार महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यापैकी जवळपास 26 लाख 34 हजार महिला या योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरविण्यात आले आहे.
अपात्र ठरवण्याची कारणे!
- काही महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. दुसऱ्या योजनेतून मदत घेत असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही.
- एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला.
- वय मर्यादेबाहेरील महिला लाभ घेण्याचा दावा आहे. योजनेनुसार फक्त 21 ते 65 वर्षे वय असलेली महिला लाभार्थी असू शकतात.
अशी झाली कारवाई
- जून महिन्यापासून ज्या लाभार्थी महिलांची पात्रता नाही, त्याचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
- जिल्हास्तरावरच्या छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान विभाग व महिला व बालविकास विभाग यांना लाभार्थींच्या अर्जांची, कागदपत्रांची बारीक पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- पात्र असलेल्या लाभार्थींचे सन्माननिधी हप्ते दिले जात आहेत, परंतु अपात्र ठरलेल्या महिलांचे हप्ते थांबवले आहे.
हेही वाचा - लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा, या महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये!
लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे काय आहेत
- लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.
- जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
- अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी सांगितले स्पष्टच...