जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. असे ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात पैसै आले नसतील तर…
ऑगस्टचा हप्ता जमा कधी होणार?
- 11 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- प्रत्येक पात्र महिलेच्या आधार-लिंक असलेल्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जाणार आहे.
- पुढील 3 ते 4 दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हा पैसा पोहोचेल.
बँक खात्यात पैसे आले का ? असं तपासा स्टेटस
- लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल.
- बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
- तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
- डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
- तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, आदिती तटकरे यांची माहिती
