वर्धा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बहुतांश मोठी शासकीय कार्यालये येथे आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमामुळे हा परिसर प्रसिद्ध आहे. वर्धा नदी आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात असल्याने हा परिसर नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आहे. विश्वशांती स्तूप हे येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिंगणघाट व पुलगाव येथे कापूस कापड गिरण्या आहेत. अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रभाषा प्रचार समिती, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ प्रमुख आहेत.