जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत दिसू लागले आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात भारतीय हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी (Rain Alert in Maharashtra) केला आहे. पुढील 3 दिवसांपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कमी दाबाचा पट्टा सक्रिय!
अरबी समुद्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात रात्री व पहाटेच्या सुमारास वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा अंदाज!
- मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस.
- पश्चिम महाराष्ट्रतील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर परिसरात हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज.
- विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा!
हवामान खात्याने शेतकऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
- शेतमाल काढणीसाठी पुढील 2–3 दिवस प्रतीक्षा करावी.
- साठवलेले धान, सोयाबीन, कापूस किंवा हरभरा पिके पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
- खुल्या शेतांतील तणनाशके किंवा कीटकनाशकांचा वापर पुढील काही दिवस टाळावा.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील कपाशीला फटका; खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
