शरद गोविंदराव पवार (Sharad Pawar) भारतीय राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत. शरद पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून पी.व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री तर मनमोहन सरकारमध्ये १० वर्षे केंद्रीय कृषीमंत्रीपद सांभाळले आहे. काँग्रेसमधून वेगळं झाल्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.