जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे मुंबईचे मतदार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून विनंती केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
‘राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा’
सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहे. यामुळे महाराष्ट्रातून पाठबळ मिळाला पाहिजे, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा” अशी विनंती दोन्ही नेत्यांना केली आहे, असं फडणवीस यांनी म्हणाले.
उपराष्ट्रपती निवडणुकीत राज्यात चूरस
इंडिया आघाडी विरुद्ध एनडीएस असा थेट सामना होणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा इंडिया आघाडीचे उमेदवार सुप्रीम कोर्ट माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना आहे. यामुळे केंद्रात जरी उपराष्ट्रपतीची निवडणूक असली तरी राज्यात मात्र सत्ता आणि विरोधी पक्षात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे.
शरद पवार आणि ठाकरेंचे संसदेतील बलाबल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे संसदेत एकूण 11 खासदार आहेत. तर शरद पवार यांच्या पक्षाकडे एकूण 10 खासदार आहेत.