राज उर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे (Raj Thackeray) भारतीय राजकारणी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवसेनेत डावलले जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले व 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधातील मनसेचे आंदेलन चांगलेच गाजले होते. राज ठाकरे आपले चुलते बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे व्यंगचित्रकारही आहेत.