जेएनएन, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी शिवतिर्थावर पोहोचले आहेत.

फडणवीस यांनी घेतले राज ठाकरे यांच्या गणपतीचे दर्शन 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणेश स्थापनेनंतर फडणवीस यांनी राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. फडणवीस यांच्या दर्शनापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन घेतले होते.

उद्धव ठाकरेंनी घेतले राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले आहेत. उद्धव हे जवळपास 22 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले.

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानातील बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील काकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले. रश्मी ठाकरे यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.