जेएनएन, मुंबई: शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी त्यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांमधील युतीच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी त्यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांची बैठक
राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' येथे दोन्ही पक्षप्रमुख आणि त्यांच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. दोन्ही चुलत भावंडांमधील हा दुसरा सार्वजनिक संवाद आहे. यापूर्वी उद्धव यांनी गणेशोत्सवानिमित्त शिवतीर्थाचे दर्शन घेतले होते.
उद्धव 22 वर्षांनी गेले होते राज ठाकरेंच्या घरी
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले होते. उद्धव हे जवळपास 22 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. आता उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थवर जाण्याची ही दुसरी वेळ आहे.
पुन्हा उद्धव-राज एकत्र
मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरुन एक व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आणि मनसेची युती होणार असा चर्चा सुरु झाल्या होत्या. यातच आता पुन्हा एकदा उद्धव-राज एकत्र आले आहेत.