जेएनएन, नवी दिल्ली. Dasara Melava Live Update: दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे शिवसेना, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे तसेच धम्मचक्र संमेलन असे सहा मेळावे होणार आहेत. यांच्या माध्यमातून नागरिक विचारांचे सोने लूटणार आहेत.
आरएसएसचे संचलन
नागपूर येथे सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मुख्यालयात विजयादशमीनिमित्त भव्य संचलन आहे. यावेळी आरएसएसचे सरसंघचाक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम विशेष आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंचा मेळावा
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्क मैदानात होईल. आगामी मुंंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग या मेळाव्यातून फुंकले जाण्याची शक्यता आहे. तसंच, शिवसेना- मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा
एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळावा गोरेगावमध्ये आयोजित केला आहे. राज्यातील पूरस्थिती, मुंबईतील सोयीसुविधा, मुंबईतील वाढती विकासकामे यांना पकडून एकनाथ शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
पंकजा मुंडेंचा सावरगावात दसरा मेळावा
मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथं वार्षिक दसरा मेळाव्यात झाला. विरासत मैं सघर्ष मिला है, तो जिद्द भी मिली है लडने की, चाहे जो भी है, डटकर आगे बढने की, बदलू मै खूद को क्यू, मैं विचारोंकी अलट चोटी हुॅं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हुॅं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मनोज जरांगेचा दसरा मेळावा
मराठा समाजाला आोबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचा नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यात आरक्षणावर जरांगे कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
नागपुरातील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापण दिन सोहळा साजरा केला जातो. यंदा 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होत आहे.
- 2025-10-02 16:10:02
जरांगे यांच्या सरकारकडे 8 मागण्या
मराठा समाजाला आोबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचा नारायणगडावर दसरा मेळावा झाला. यावेळी जरांगे यांनी 8 मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सविस्तर वाचा - Manoj Jarange Dasara Melava: 'फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या' मनोज जरांगे यांनी का केली अशी मागणी? - 2025-10-02 16:08:01
म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला - पंकजा मुंडे
सभेला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पंकजा मुडे म्हणाल्या. सविस्तर वाचा - Pankaja Munde Dasara Melava: …म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला - पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती - 2025-10-02 14:05:07
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हुॅं - पंकजा मुंडे
विरासत मैं सघर्ष मिला है, तो जिद्द भी मिली है लडने की, चाहे जो भी है, डटकर आगे बढने की, बदलू मै खूद को क्यू, मैं विचारोंकी अलट चोटी हुॅं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हुॅं - पंकजा मुंडे - 2025-10-02 13:59:32
पूरस्थिती असतानाही तुम्ही सीमोल्लंघन केलं - पंकजा मुंडे
पूरस्थिती असतानाही तुम्ही सीमोल्लंघन केलं. सीमोल्लंघन ही एक परपंरा आहे. डोंगरकपारीत फाटक्या माणसांचा कार्यक्रम आहे. सर्व राज्यातून माणसे आले आहेत. मी आपले आभार मानते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या दसरा मेळाव्याला सुरुवात केली. - 2025-10-02 13:42:15
RSS च्या शताब्दीनिमित्त समुद्रकिनारी वाळूतून बनवली अद्भूत कलाकृती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 100 वर्षांच्या स्मृतीनिमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी वाळू कलाकृती तयार केली. वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक म्हणाले, "1925 मध्ये विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून देशसेवेसाठी समर्पित असलेले लोक आजपर्यंत स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. आज, संपूर्ण जगाला माहिती आहे की, 100 वर्षांहून अधिक काळ, संघाचे लोक भारताची सेवा करत आहेत. या विजयादशमीला, 2 ऑक्टोबर रोजी, संघ 100 वर्षे पूर्ण करत आहे आणि शतकानुशतके देशाची अथक सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करत आहोत."https://twitter.com/ANI/status/1973660821839389077
- 2025-10-02 12:19:50
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा लवकरच होणार सुरु
मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथं वार्षिक दसरा मेळावा होत आहे. थोड्याच वेळात हा मेळावा सुरु होणार आहे. कडाक्याच्या उन्हात नागरिक हे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी आले आहेत. नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या पंकजा मुंडे या वंजारी समाजाला काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. - 2025-10-02 11:22:41
कोण आहेत एकनाथ शिंदे - संजय राऊत
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणतात, "... महाराष्ट्रात फक्त दोनच मोठ्या दसरा मेळाव्या होतात, एक नागपूरमध्ये आरएसएसचा, ज्याला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दुसरा मुंबईतील शिवाजी पार्क येथे, जिथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती आणि गेल्या 60-65 वर्षांपासून ही मेळावा आयोजित केला जात आहे. आजची मेळावा तिथे होईल, उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील आणि लाखो शिवसैनिक जमतील. शिंदे-शिंदे काय करत आहात, कोण आहेत एकनाथ शिंदे?"https://twitter.com/ians_india/status/1973621793089876271
- 2025-10-02 10:28:20
मुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी ट्वीटकरुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही उपस्थित होते. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे... नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री विजयादशमी उत्सव - संघ शताब्दी वर्ष... - 2025-10-02 09:59:01
RSS हा एका पवित्र, उंच वटवृक्षासारखा
आरएसएस हा एका पवित्र, उंच वटवृक्षासारखा आहे जो भारतातील लोकांना एकत्र करतो: रामनाथ कोविंद - 2025-10-02 09:59:05
विजयादशमी उत्सव
आज महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. मी या महापुरुषांच्या स्मृतींना आदरपूर्वक आदरांजली वाहतो. 'विजयादशमी उत्सव' हा दिवस संघाच्या 'शताब्दी उत्सव' म्हणून देखील साजरा केला जातो. - 2025-10-02 09:19:00
माझे जीवन घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन डॉक्टर
नागपुरात आरआरएसचा मुख्यकार्यक्रम सुरु आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "नागपूरची ही पवित्र भूमी आधुनिक भारताच्या प्रतिष्ठित राष्ट्र-निर्मात्यांच्या आदरणीय स्मृतींशी जवळून जोडलेली आहे. या राष्ट्र-निर्मात्यांमध्ये माझे जीवन घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन डॉक्टर आहेत, डॉ. के. बी. हेडगेवार आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर..." - 2025-10-02 07:18:17
Dasara Shubh Muhurt: दसऱ्याचा शुभ मुहूर्त
Dasara 2025: दसरा हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी गुरुवार, 02 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी, दसऱ्याच्या दिवशी दुपारी 1:21 ते 3:44 पर्यंतचा काळात अत्यंत शुभ योग आहे. तर 2 ऑक्टोबर रोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील (शुक्ल पक्ष) दशमी तिथी संध्याकाळी 7:10 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर, एकादशी तिथी सुरू होईल. - 2025-10-02 07:14:11
Dasara 2025 Live: शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
सत्य आणि सद्गुणाने वाईटावर विजय मिळवल्याचे प्रतीक असलेला दसऱ्याचा सण आपल्याला प्रत्येक संकटावर मात करण्याची उमेद देवो. हा दिवस आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती आणि सकारात्मक संकल्प करण्याची प्रेरणा देवो. अशा शब्दात शरद पवार यांनी दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. - 2025-10-02 07:07:34
RSS Path Sanchalan in Pune: पुण्यात आरएसएसचे संचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) पुण्यात 'पथ संचलन' केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजप नेत्यांनी RSS च्या स्थापनेच्या 100 व्या वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.https://twitter.com/ANI/status/1973561257509728600
- 2025-10-02 07:02:11
PM Wishes: पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
विजयादशमी ही वाईट आणि असत्यावर चांगुलपणा आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा शुभ प्रसंग सर्वांना धैर्य, ज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देवो, असं म्हणतं पंतप्रधानांनी दसऱ्याच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.https://twitter.com/narendramodi/status/1973553775462981921
- 2025-10-02 06:58:36
RSS: आरएसएसचे विजयादशमीनिमित्त संचलन
आरएसएसचे संचलन नागपूर येथे सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मुख्यालयात विजयादशमीनिमित्त भव्य संचलन आहे. यावेळी आरएसएसचे सरसंघचाक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम विशे आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. - 2025-10-02 06:55:17
Eknath Shinde Dasara Melava: एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले
Shiv sena Dasara Melava 2025 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना त्यांचा वार्षिक दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाऐवजी गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित करेल. शहरात मुसळधार पावसामुळे आझाद मैदानाचे डबक्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे ही रॅली आता आझाद मैदानावर न होतो नेस्को केंद्रात होणार आहे. सविस्तर वाचा - Shivsena Dasara Melava 2025 : शिंदेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले; आता आझाद मैदानाऐवजी येथे भरणार मेळावा - 2025-10-02 06:53:24
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा दसरा मेळावा कधी आणि कुठे होणार आहे? शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे. जानेवारी 2025 मध्ये बीएमसीकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि नऊ महिन्यांनंतर परवानगी मिळाली आहे. सविस्तर वाचा - Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा यंदा का आहे खास… वाचा नेमकं काय आहेत कारणे? - 2025-10-02 06:49:41
Dasara 2025: राज्यात सहा दसरा मेळावे
दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे शिवसेना, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे तसेच धम्मचक्र संमेलन असे सहा मेळावे होणार आहेत. यांच्या माध्यमातून नागरिक विचारांचे सोने लूटणार आहेत.