जेएनएन, मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Election in Maharashtra) घ्या 31 जानेवारीच्या पूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता निवडणूक आयोग कसून कामाला लागले आहे. यातच आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे.
जिल्हा परिषदा व पंचायत समितीचे आरक्षण सोडत
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण होणार घोषित
संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) October 1, 2025
त्या संबधित प्रसिद्धीपत्रक
हेही वाचा - Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा यंदा का आहे खास… वाचा नेमकं काय आहेत कारणे?
प्रभागनिहाय प्रारूप मतदार 8 ऑक्टोबर रोजी होणार जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.