जेएनएन, बीड. Pankaja Munde Dasara Melava 2025: मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथं वार्षिक दसरा मेळावा झाला. पूरस्थिती असताना आणि कडाक्याच्या उन्हात नागरिक हे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी आले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी पूरस्थिती असतानाही तुम्ही सीमोल्लंघन केलं. सीमोल्लंघन ही एक परपंरा आहे. डोंगरकपारीत फाटक्या माणसांचा कार्यक्रम आहे. सर्व राज्यातून माणसे आले आहेत. मी आपले आभार मानते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या दसरा मेळाव्याला सुरुवात केली.
तसंच, सभेला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पंकजा मुडे म्हणाल्या.
“मी शपथ घेते की मुंडे साहेबांनी मला जो वसा दिला आहे तो वसा आणि वारसा… मी कधीही खाली मान घालायला लावणार नाही. सत्तेत बसलेली असेन किंवा विरोधात असेल, सामान्य मानसाचं हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही.”
“पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना, प्रत्येक जाती-पातीच्या माणसासाठी लढणार आहे. काल आमचा बोऱ्हाडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली. गोपीनाथ मुंडेनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. मराठा आरक्षणाला मुंडे साहेबांनी विरोध केला नाही, पण आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका. येवढीच विनंती आम्ही केली आहे,”
“माझ्या मंचावर उपस्थित असलेल्या, निवडून आलेल्या मानसाच्या प्रचाराला गेले, त्याची कधी जात पाहिली नाही. जात पाहिली ती फक्त माणसाची जात पाहिली, कारण मी शिकलेच नाही जात पाहणं, भेदभाव करणं. कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही. माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही,”