जेएनएन, बीड. मराठा समाजाला आोबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचा नारायणगडावर दसरा मेळावा (Dasara Melava) झाला. यावेळी जरांगे यांनी 8 मागण्या सरकारकडे केल्या आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, ही त्यांनी प्रमुख मागणी केली. सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार, सरकारला एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा देखील त्यांनी दिला.
ओला दुष्काळ जाहीर करावा
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rains) थैमान घातले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी घेतली जात आहे. तर विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दसरा मेळाव्यातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपयांचे मदत
‘मी सरकारला जाहीरपणाने सांगत आहे की, मराठवाड्यात आणि मराठवाड्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, त्याशिवाय माघार नाही. हे काम दिवाळीच्या आत करायचे आहे. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपयांचे मदत द्यायची. आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आहे,’ असं जरांगे म्हणाले.
सरसकट नुकसान भरपाई द्यावी
ज्यांचे शेत वाहून गेले नाही, त्यांना सरसकट 70 हजार रुपये हेक्टरी मदत करा. ज्यांच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेलेत, पीक वाहून गेले त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई म्हणून द्यावी. ज्यांचे जनावरं वाहून गेले, कांदा वाहून गेला, सोयाबीन वाहून गेले, धान्य वाहून गेले त्या लोकांचे शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून सरसकट 100 टक्के भरपाई द्यावी, अशा मागणी त्यांनी केली.
ऊसाचा एक रुपया सुद्धा कापायचा नाही
शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला एक लाख पगार आहे त्याचे 25 हजार रुपये कापा. ज्याला दोन लाख रुपये पगार आहे त्याचे 50 हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील.
- फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या.
- शेतीला हमीभाव द्या, पिक विमाला बसवलेले ट्रिगर काढा. संपूर्ण विमा द्या.
- सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या.
हेही वाचा - Pankaja Munde Dasara Melava: …म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला - पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती