मुंबई, (पीटीआय) : shivsena dasara melava 2025 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले की, शिवसेना त्यांचा वार्षिक दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाऐवजी गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित करेल.

शहरात मुसळधार पावसामुळे आझाद मैदानाचे डबक्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे ही रॅली आता आझाद मैदानावर न होतो नेस्को केंद्रात होणार आहे.

 शिंदे यांनी सांगितले की, यंदाचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होईल. पावसामुळे मैदानावर पाणी साचले आहे, त्यामुळे दसरा मेळावा येथे होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी मेळाव्याचे नवे ठिकाण सांगितले.

शिंदे यांनी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) व्यतिरिक्त राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि सणांच्या काळात त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी शिवसेनेने (UBT) शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेथेही पावसामुळे दुरवस्था झाली आहे.

१९६६ मध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर वार्षिक दसरा मेळावा सुरू केला होता. २०२२ मध्ये शिवसेना फुटल्यानंतर, पक्षातील प्रत्येक गट - शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गट आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष - स्वतंत्र मेळावे घेतात.

    २ ऑक्टोबर रोजी दोन्ही गटाकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.