जेएनएन, मुंबई. Maharashtra Board 10th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या निकाल (10th Results 2025) मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी ऑनलाईन जाहीर केला आहे. 

निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळ (ssc maharashtra board result 2025 date and time):

निकाल मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे: 

  • https://results.digilocker.gov.in
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • http://sscresult.mkcl.org 

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होतील आणि त्याची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. शाळांसाठी एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती https://mahahsscboard.in (in school login) येथे उपलब्ध होईल. (Maharashtra Board 10th Results 2025)

किती विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

राज्य शिक्षण मंडळामार्फत नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागातून 5,130 मुख्य केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत दहावीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610  विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले, तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.

  • 2025-05-13 18:06:42

    मुख्यमंत्र्यांनी दिल्या दहावीच्या विद्यार्थांना शुभेच्छा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थांचे अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून असेच यश जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला मिळत राहो याच सदिच्छा..., असं त्यांनी आपल्या X वर म्हटलं आहे.
  • 2025-05-13 17:17:15

    SSC Results: निकालानंतर गुणसुधार, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे

    Maharashtra Board 10th Result 2025 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. दहावीच्या निकालानंतर गुणसुधार, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे…  सविस्तर वाचा -

    Maharashtra 10th Result 2025: दहावीच्या निकालानंतर गुणसुधार, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे…वाचा सविस्तर
  • 2025-05-13 16:39:19

    शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

    दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा - Maharashtra 10th Result 2025: दहावीचा निकाल 94.10 टक्के, यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत - शिक्षण मंत्री 
  • 2025-05-13 16:07:21

    Maharashtra 10th Exam 2025: श्रेणीसुधार/गुणसुधार योजना

    फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी गुण सुधारण्यासाठी पुढील 3 परीक्षा देऊ शकतात: जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 आणि जून-जुलै 2026. यासाठी त्यांना सर्व विषय पुन्हा एकदा देणे आवश्यक आहे.
  • 2025-05-13 15:55:16

    SSC Result 2025: 100% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची विभागवार संख्या

    पुणे: 13 नागपूर: 3 संभाजीनगर: 40 मुंबई: 8 अमरावती: 11 लातूर: 113 कोकण: 9 एकूण: 211
  • 2025-05-13 15:22:05

    पुनर्मूल्यांकन सूचना: फेब्रुवारी-मार्च 2025

    उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यावर 5 दिवसांत, प्रति विषय रु. 300/- शुल्कासह ऑनलाईन अर्ज करा.
  • 2025-05-13 14:35:40

    SSC Result 2025 Maharashtra Board: प्रमाणपत्राची प्रिंट आउट काढण्याची सोय

    माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपरोक्त नमूद केलेल्या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. याव्यतिरिक्त, शाळांना एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती mahahsscboard.in या संकेतस्थळावर त्यांच्या लॉगीनमधून (स्कूल लॉगीन) उपलब्ध होईल.
  • 2025-05-13 13:38:39

    Maharashtra 10th Result 2025 division wise: विभागनिहाय दहावीचा निकाल-

    Maharashtra 10th Result 2025 division wise: विभागनिहाय दहावीचा निकाल-

    1. कोकण - 98.82%
    2. कोल्हापूर - 96.87%
    3. मुंबई - 95.84%
    4. पुणे - 94.81%
    5. नाशिक - 93.04%
    6. अमरावती - 92.95%
    7. छत्रपती संभाजीनगर - 92.82%
    8. लातूर - 92.77%
    9. नागपूर - 90.78%
  • 2025-05-13 13:03:01

    Maharashtra SSC Results LIVE Updates: 9 विभागीय मंडळातून एकूण 24,376 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी

    या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.

  • 2025-05-13 12:54:08

    SSC Result 2025 Live Updates: राज्यातील 7,924 शाळांचा निकाल 100%

    महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या SSC परीक्षेसाठी राज्यातील एकूण 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अभिमानास्पद बाब म्हणजे, यापैकी 7,924 शाळांनी 100% निकालाची उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे बोर्डाने आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
  • 2025-05-13 11:56:26

    Maharashtra SSC Result 2025 Live Updates: कोकण सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग

    महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी, कोकण पुन्हा एकदा एकूण 98.82% निकालासह सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग ठरला आहे.
  • 2025-05-13 11:52:24

    Maharashtra SSC Result 2025 Live: 2.4 लाखांहून अधिक उमेदवारांना सवलतीचे गुण

    यावर्षी, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), स्काऊट आणि गाईड, खेळ, कला आणि संस्कृती यांसारख्या अतिरिक्त उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल 2,46,602 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत.
  • 2025-05-13 11:48:03

    Maharashtra SSC Result 2025 Live Updates: दुपारी 1 वाजता सक्रिय होईल लिंक

    विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठीची लिंक दुपारी 1 वाजता सक्रिय केली जाईल.
  • 2025-05-13 11:44:51

    Maharashtra SSC Result 2025 Live Updates: मुलींनी मुलांना 3.83% ने मागे टाकले

    मुलींनी मुलांना 3.83% ने मागे टाकले आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 96.14% आहे, तर मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 92.31% आहे.
  • 2025-05-13 11:02:22

    Maharashtra Board: निकालापूर्वीच बोर्डाचा मोठा निर्णय

    दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची आदीच अकरावीची प्रवेशबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून 11 प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यामुळे पालकांना प्रवेश घेण्यासाठी कॉलेजच्या चकरा मारायची गरज नाही. सविस्तर वाचा - SSC Result 2025: आज दहावीचा निकाल; निकालापूर्वीच महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या विद्यार्थांसाठी घेतला मोठा निर्णय 
  • 2025-05-13 11:00:37

    Maharashtra SSC Result 2025 Live Updates: गेल्यावर्षी किती टक्के लागला होता निकाल 

    गेल्यावर्षी राज्यभरात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या दरम्यान झाली. या परीक्षेचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. गेल्या वर्षी राज्यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.83 टक्के एवढी होती. गेल्या वर्षी 15 लाख 49 हजार 326  विद्यार्थ्यांनी राज्यभरातून परीक्षा दिली होती. तर 2023 मध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.88 टक्के एवढी होती.
  • 2025-05-13 10:54:33

    10 th Result : किती विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

    राज्य शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत दहावीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610  विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले, तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5,130 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 
  • 2025-05-13 10:39:47

    Maharashtra SSC Result Latest News: कोणत्या विभागातून किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

    मुंबई विभागातून 3,60,317 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर पुणे विभागातून 2,75,004 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागात 27 हजार विद्यार्थी संख्या आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी 644 परीक्षा केंद्र आहेत. तर 1 लाख 88 हजार 777 नियमित विद्यार्थी असल्याची माहिती मंडळाकडून मिळाली.
  • 2025-05-13 10:33:45

    SSC Result 2025: sscresult.mkcl.org २०२५ वर निकाल कसा तपासायचा

    SSC 10th Result 2025 हा तृतीय-पक्ष वेबसाइट sscresult.mkcl.org वर देखील ऑनलाइन पाहता येईल. एमकेसीएल ही वेबसाइट महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी आहे, जी एक सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे जी शिक्षण, विकास, प्रशासन आणि सक्षमीकरण (EDGE) मध्ये नाविन्यपूर्ण डिजिटल उपाय आणि क्षमता बांधणीद्वारे नवीन आदर्श निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थी एमकेसीएल पोर्टलवर त्यांचे Maharashtra SSC Class 10th Result 2025 नावानुसार मिळविण्यासाठी खालील पायऱ्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल. sscresult.mkcl.org या पोर्टलवर MKCL Maharashtra SSC result भेट द्या. तुमच्या एसएससी हॉल तिकीट 2025 वरून महाराष्ट्र 10वी लॉगिन क्रेडेंशियल वापरून लॉग इन करा. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2025 प्रदर्शित होईल. भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र एसएससी निकाल मार्कशीट डाउनलोड करून ठेवा.
  • 2025-05-13 10:06:40

    results.digilocker.gov.in 2025 एसएससी निकाल: डिजीलॉकरद्वारे एसएससी निकाल 2025 कसा तपासायचा?

    विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसएससी निकाल 2025 डिजीलॉकर मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. डिजीलॉकर वरुनही तुम्हाला तुमचा दहावीचा निकला ऑनलाईन पद्धतीनं मिळवता येईल. डिजीलॉकर द्वारे निकाल पाहाण्याच्या सोप्या टिप्स… 
    • तुमचा आधार क्रमांक वापरून डिजीलॉकर मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि लॉग इन करा किंवा digilocker.gov.in येथे अधिकृत डिजीलॉकर वेबसाइटला भेट द्या.
    • ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ टॅबवर नेव्हिगेट करा.
    • ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र बोर्ड’ निवडा.
    • ‘महाराष्ट्र एसएससी 10 वी मार्कशीट 2025’ साठी पर्याय निवडा
    • दिलेल्या फील्डमध्ये तुमचे उत्तीर्ण वर्ष आणि रोल नंबर प्रविष्ट करा.
    • ‘कागदपत्र मिळवा’ बटणावर टॅप करा.
    • तुमच्या तपशीलांची पुष्टी करा आणि भविष्यातील वापरासाठी महाराष्ट्र एसएससी इयत्ता 10 वी निकाल मार्कशीट जतन करण्यासाठी ‘सेव्ह टू लॉकर’ टॅबवर दाबा.
    सविस्तर वाचा - results.digilocker.gov.in 2025 एसएससी निकाल: डिजीलॉकरद्वारे एसएससी निकाल 2025 कसा तपासायचा?
  • 2025-05-13 10:01:05

    SSC Result 2025: दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी कधी अर्ज करता येणार

    दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थांना श्रेणीसुधार करण्यासाठी पुरवणी परीक्षा देता येते. जून-जुलै 2025 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक 15/05/2025 पासून ऑनलाईन आवेदनपत्र भरता येतील
  • 2025-05-13 09:57:14

    mahresults.nic.in 2025 date and time: mahresults.nic.in वरून दहावीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

    ज्या विद्यार्थ्यांनी 2025 ची दहावीची परीक्षा दिली आहे. ते महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या वेबसाइट mahresults.nic.in वरून त्यांचे निकाल ऑनलाइन डाउनलोड करु शकताता. यासाठी पुढील सोप्या पायऱ्यांचा अवलंब करा. - महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत निकाल पोर्टल mahresult.nic.in ला भेट द्या. - एसएससी निकाल लिंकवर क्लिक करा. - महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून लॉगिन करा. - महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2025 तुम्हाला समोर दिसेल. - तुमची माहिती तपासा आणि सर्वकाही बरोबर आहे, याची खात्री करा. - भविष्यातील संदर्भासाठी SSC Result 2025 गुणपत्रक डाउनलोड करा.
  • 2025-05-13 09:41:26

    दहावीचा निकाल कसा पाहायचा? (How To Check 10th Result 2025)

    महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल:
    • सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइटवर जा: - www.mahahsscboard.in - mahresult.nic - hscresult.mkcl.org
    • वेबसाइट उघडल्यानंतर, निकालाचा दिवशी लिंक सक्रिय झाल्यानंतर "Maharashtra State Board, SSC Examination February 2025 Result" वर क्लिक करा.
    • त्यानंतर View SSC Result या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर, तुमच्यासमोर निकालासंदर्भात विंडो उघडेल.
    • यात तुमचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचं नाव (Mother's First Name) भरून View Result या बटणावर क्लिक करा.
    • तुमचं एसएससी निकाल (SSC Result ) स्क्रीनवर दिसेल.
    • त्यानंतर पीडीएफ डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची खऱ्या मार्कशीट मिळत नाही.
    सविस्तर वाचा - Maharashtra Board 10th Results 2025: दहावीचा निकाल, विद्यार्थ्यांनी कुठे आणि कसा पाहता निकाल? वाचा सविस्तर…
  • 2025-05-13 09:39:46

    mahahsscboard.in 2025 लिंक: दहावीचा निकाल कुठे तपासायचा?

    महाराष्ट्र बोर्ड पत्रकार परिषदेनंतर इयत्ता 10 वी एसएससी निकाल 2025 अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. तुमचे निकाल मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइटची यादी खाली नमूद केली आहे: sscresult.mahahsscboard.in mahahsscboard.in results.digilocker.gov.in   सविस्तर वाचा - SSC Result 2025: दहावीच्या निकालाच्या बोर्डाकडून अधिकृत लिंक जाहीर, निकाल कसा पाहायचा, सोप्या टिप्स…
  • 2025-05-13 09:35:07

    sscresult.mahahsscboard.in 2025 date: एसएमएसद्वारे SSC निकाल 2025 कसा तपासायचा? (How to check SSC Result 2025 via SMS?)

    विद्यार्थी त्यांचे निकाल महाराष्ट्र बोर्डाने प्रदान केलेल्या एसएमएस सेवेद्वारे ऑफलाइन देखील मिळवू शकतात जेणेकरून वेबसाइट्स योग्यरित्या काम करत नसतील तर तुमचे निकाल सहजपणे मिळतील. खालील चरणांमुळे तुमचे निकाल थेट तुमच्या डिव्हाइसवर ऑफलाइन मिळण्यास मदत होऊ शकते: तुमच्या फोनवर एसएमएस मोबाइल अॅप्लिकेशन उघडा * “MHSSC(सीट नंबर)” टाइप करा * तो 57766 वर पाठवा * महाराष्ट्र राज्य बोर्ड तुमचा एसएससी निकाल 2025 मार्कशीट थेट तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर पाठवेल.
  • 2025-05-13 09:13:05

    SSC Result 2025: आज दहावीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल (10th Results 2025) आज दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00  वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.