जेएनएन. मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या निकाल (10th Results 2025) 3 मे रोजी दुपारी 1.00  वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,11,610  विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले, तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. त्यांचा आज निकाल लागणार आहे. मुलांची धाकधूक वाढली आहे.

डिजीलॉकर अॅपवरुन निकाल कसा पाहायचा

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसएससी निकाल 2025 डिजीलॉकर मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. डिजीलॉकर वरुनही तुम्हाला तुमचा दहावीचा निकला ऑनलाईन पद्धतीनं मिळवता येईल. डिजीलॉकर द्वारे निकाल पाहाण्याच्या सोप्या टिप्स… 

  • तुमचा आधार क्रमांक वापरून डिजीलॉकर मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि लॉग इन करा किंवा digilocker.gov.in येथे अधिकृत डिजीलॉकर वेबसाइटला भेट द्या.
  • ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ टॅबवर नेव्हिगेट करा.
  • ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र बोर्ड’ निवडा.
  • ‘महाराष्ट्र एसएससी 10 वी मार्कशीट 2025’ साठी पर्याय निवडा
  • दिलेल्या फील्डमध्ये तुमचे उत्तीर्ण वर्ष आणि रोल नंबर प्रविष्ट करा.
  • ‘कागदपत्र मिळवा’ बटणावर टॅप करा.
  • तुमच्या तपशीलांची पुष्टी करा आणि भविष्यातील वापरासाठी महाराष्ट्र एसएससी इयत्ता 10 वी निकाल मार्कशीट जतन करण्यासाठी ‘सेव्ह टू लॉकर’ टॅबवर दाबा.

हेही वाचा - LIVE Maharashtra SSC 10th Result 2025: वेबसाइट्स योग्यरित्या काम करत नसतील तर निकाल कसा पाहावा, वाचा सविस्तर...

दहावीचा निकाल कसा पाहायचा? (How To Check 10th Result 2025)

महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल:

    • सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइटवर जा:
      - https://results.digilocker.gov.in
      - https://sscresult.mahahsscboard.in
      - http://sscresult.mkcl.org 
    • या वेबसाइट उघडल्यानंतर, निकालाचा उद्या दुपारी एक वाजता लिंक सक्रिय झाल्यानंतर "Maharashtra State Board, SSC Examination February 2025 Result" वर क्लिक करा.
    • त्यानंतर View SSC Result या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर, तुमच्यासमोर निकालासंदर्भात विंडो उघडेल.
    • यात तुमचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother's First Name) भरून View Results या बटणावर क्लिक करा.
    • तुमचा दहावीचा निकाल (SSC Result ) स्क्रीनवर दिसेल.
    • त्यानंतर पीडीएफ डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची खऱ्या मार्कशीट मिळत नाही.

    हेही वाचा - SSC Result 2025: दहावीच्या निकालाच्या बोर्डाकडून अधिकृत लिंक जाहीर, निकाल कसा पाहायचा, सोप्या टिप्स…