जेएनएन, पुणे: Maharashtra Board SSC Result 2025: दहावीचा निकाल आज (13 मे) दुपारी 1 वाजता लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. निकालसाठी महाराष्ट्र बोर्डने अधिकृत संकेतस्थळ प्रसिद्ध केले आहे.
- http://sscresult.mkcl.org
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहिती प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
हेही वाचा - SSC Result 2025: दहावीच्या निकालाच्या बोर्डाकडून अधिकृत लिंक जाहीर, निकाल कसा पाहायचा, सोप्या टिप्स…
बोर्डाचा निकालापूर्वीच मोठा निर्णय
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची आदीच अकरावीची प्रवेशबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून 11 प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यामुळे पालकांना प्रवेश घेण्यासाठी कॉलेजच्या चकरा मारायची गरज नाही. खरतरं यापूर्वी दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी या कॉलेज ते कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागत होते. विद्यार्थी आणि पालक यांची मोठी गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे आहेत 11 वी प्रवेशचे संकेतस्थळ
महाराष्ट्र बोर्डाने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकमध्ये अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in दिले आहे. 11 वीच्या प्रवेश प्रक्रियसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी याच संकेतस्थळांचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे. दुसऱ्या कोणत्याही संकेतस्थळाचा वापर केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते असे आवाहन बोर्डाने केले आहे.
