मुंबईतील लोकल रेल्वेला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटले जाते. मुंबई लोकल मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेचे एक विस्तृत जाळे आहे. लोकल सेवा मुंबईकरांच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. मुंबईतील पहिली लोकल ट्रेन 3 फेब्रुवारी 1925 रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान धावली. ही चार डब्यांची इलेक्ट्रिक ट्रेन होती आणि आजही दररोज लाखो मुंबईकर त्यातून प्रवास करतात. लोकलच्या शेकडो फेऱ्यांमध्ये हजारो-लाखो प्रवासी रोजचा प्रवास करत असतात. <
This website uses cookies or similar technologies to enhance your browsing experience and provide personalized recommendations. By continuing to use our website, you agree to our Privacy Policy and Cookie Policy.