जेएनएन, मुंबई. Mumbai Local Train News: राज्यात अलीकडे घडलेल्या दुर्दैवी रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.

प्रशासनाची बैठक

मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूच्या घटनांमुळे ही गंभीर बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका, प्रशासन, महसूल, परिवहन व नगरविकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करा

पावसाळा आणि त्यानंतर येणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणांनी अधिक सजग राहणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नोडल अधिकारी नेमावेत, आणि गरज भासल्यास निवृत्त व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. तसेच, प्रवाशांसाठी स्पष्ट व प्रभावी मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करावेत असे निर्देश सौनिक यांनी दिले आहे.

मुंबईत दाणादाण

    मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले आहे. बेलापुरमधील पाणी अद्यापही ओसरलं नाही, बेलापूर सेक्टर 3 आणि 4 मध्ये पाणीच पाणी झाले. पाण्यामध्ये अनेक वाहन पडली बंद आहे तर पाण्यामध्ये बस देखील अडकली, पाण्यातमध्ये नवी मुंबई पालिकेची बस अडकल्याने प्रवाशी चालत निघाले आहेत. मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला मोठा फटका बसला आहे. आचार्च अत्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी झाले आहे.