अमित शाह (Amit Shah) भारतीय राजकारणी तसेच सध्या भारताचे गृहमंत्री आहेत. त्याआधी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच गुजरातचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे. अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम 370 हटवण्याचा धाडसी निर्णय घेतला. 1987 मध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली होती.