विनोद राठोड, मुंबई. Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त ते लालबागच्या राजाचे तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा!
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची सविस्तर माहिती अमित शाह यांनी घेतली आहे. राज्यातील आंदोलनाची परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त आणि आंदोलनाच्या मागण्यांवर त्यांनी चर्चा केली आहे.
राजकीय घडामोडींवरही चर्चा!
अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नासोबतच बिहार विधानसभा निवडणुका आणि 'इंडिया' आघाडीच्या उमेदवारांविरोधात होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा केली आहे.
गणेश मंडळांना भेटी!
मुंबईकरांचा लाडका गणेशोत्सव सुरू असताना, अमित शाह आज दिवसभरात लालबागचा राजा, गिरगावमधील चेतन समाज गणेशोत्सव मंडळ, अंधेरी आणि इतर प्रमुख मंडळांना भेट देऊन दर्शन घेणार आहेत. ते गणेश भक्तांशी संवादही साधणार आहेत.