मुंबई. Maharashtra Municipal Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुसाठी सत्ताधारी भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपाचे भिजत घोंघडे आहे. एकनाथ शिंदे यांच्या 100 जागांचा प्रस्ताव भाजपने नाकारला असला तरी फडणवीस वारंवार जोर देत आहेत की, मुंबईत महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाईल. भाजपने शिंदेच्या शिवसेनेला जवळ करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर सारत मैत्रीपूर्ण लढतीचे पिल्लू सोडले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन गट एकत्र येणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात मुंबईसह 7 महानगरपालिकांसाठी युती झाली आहे. त्यांच्यात जागावाटप बाकी असतानाच काँग्रेस हा तिसरा भिडू ठाकरे बंधूंसोबत केमिस्ट्री तयार करत आहे.

बीएमसीसह 29 महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच आघाडी व युतीचे राजकारण मागे पडून अनेक पक्षांनी आपआपल्या सोयीची भूमिका घेत नैसर्गित युती करण्यावर भर दिला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये फूट पडली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष फुटले असून महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे. या पार्श्वभूमीवर  राज्याच्या राजकारणात नवीनच एका तिसऱ्या आघाडीचा उदय होत आहे. 

जागावाटपात कितीही ताणले तरी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी मैत्री कायम ठेवली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवले आहे. दुसरीकडे उद्धव व राज एकत्र आल्याने महाआघाडीला तडा गेला आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी आपल्या काकांशी तडजोड करत हातमिळवण्यासाठी हात पुढे केला आहे. काका-पुतण्याची मुंबईत सिल्वर ओकवर भेट झाल्याने पवार कुटूंबातील एकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. उद्धव य़ांनी राजरोबत जाण्याची घोषणा करताच महाआघाडीतून वेगळे झालेल्या काँग्रेसने पुण्याबाबत वेगळे विचार करत ठाकरे बंधूंशी हातमिळवणी केली आहे.

राज्यात दोन आघाड्या असल्या तरी मुंबई व पुणे महानगरपालिका निवडणुकीत तीन आघाड्या तयार होत आहेत.   

1- भाजप-शिंदे यांची महायुती -

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तिन्ही पक्षांनी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या, परंतु महापालिका निवडणुकीत त्यांच्यात फाटाफूट झाली आहे. भाजपने बीएमसीसह राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांपासून स्वतःला दूर ठेवत मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय ठेवला आहे.

    मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून बीएमसीसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्याचा विचार केला आहे. त्यांच्या युतीत राष्ट्रवादीचा समावेश नाही. फडणवीस वारंवार म्हणत आहेत की, शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. आता फडणवीस आणि शिंदे मिळून मुंबईपासून नागपूर आणि पुण्यापर्यंत पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहेत.

    2- पवार कुटुंबातही समेट  -

    महायुतीतून बाजूला झालेल्या अजित पवारांनी नवीन युतीचे वस्त्र विणले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांचे काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (सपा) सोबत लढवण्याची योजना आखली आहे.

    शरद पवारांचा पक्ष विरोधी महाविकास आघाडीचा भाग होता, परंतु महापालिका निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी मुंबईसाठी आपले पत्ते उघडले नसले तरी पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी अजित पवारांशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.  पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबतही चर्चा झाली. शरद पवार यांच्या पक्षाने 40 ते 45 जागा मागितल्या आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 30 जागा देण्यास तयार असल्याचे मानले जात आहे. जर पवार कुटुंब पुण्यात मैत्रीपूर्ण झाले तर ते इतर महानगरपालिकांमध्ये एकत्र नशीब आजमावू शकतात. अशाप्रकारे पवार कुटुंबाची दुसरी युती तयार झाली आहे.

    3- पुण्यात ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस -

    पुण्यात भाजप आणि शिंदे आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय केमिस्ट्री पाहून काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा विचार गुंडाळून ठेवत ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या बीएमसी निवडणुकीत काँग्रेसने राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यास नकार दिला होता. परंतु पुणे महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत युती करून निवडणूक लढवण्यास तयारी दर्शविली आहे.

    पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आता उद्धव यांच्या शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आपले नशीब आजमावेल. हा प्रस्ताव काँग्रेसनेच शिवसेनेला (यूबीटी) औपचारिकपणे पाठवला आहे. तिन्ही पक्षांमधील जागावाटपही शुक्रवारी अंतिम केले जाण्याची शक्यता आहे.  पुणे महानगरपालिकेतील एकूण 41 वॉर्डात 165 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होईल. 

    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यासोबत तिसरी युती तयार होताना दिसत आहे. अजित पवारही काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न करत होते मात्र काँग्रेसने त्यांचा प्रस्ताव नाकारक ठाकरे बंधूंना जवळ केले आहे. काँग्रेसकडून सांगण्यात आले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असून जागावाटपाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.