जेएनएन, नागपूर. ACP Niketan Kadam On Nagpur Violence: नागपुरात सोमवारी रात्री भीषण हिंसाचार झाल्याची घटना झाली आहे. औरंगजेबाची कबर हटवा या मागणीवरुन विश्व हिंद परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी सोमवारी सकाळी नागपुरात आंदोलन केली. या आंदोलनात त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. मात्र, नागपुरात काही धार्मिक मजकूर जाळला अशी अफवा बसली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दुसऱ्या एका गटाकडून रस्त्यावर हिंसाचार करण्यात आला. असं पोलिसांनी म्हटलं आहे. या हिंसाचार दरम्यान कर्तव्यावर असलेल्या डीसीपी निकेतन कदम यांनी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे.

सर्व बाजूंनी दगडफेक 

मोठा जमाव जमला होता. त्यानंतर दगडफेक झाली आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. आमच्याकडे बरेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत ज्यामध्ये काही असामाजिक घटक शस्त्रे घेऊन फिरताना दिसत आहेत. ज्या प्रकारे सर्व बाजूंनी दगडफेक होत होती, त्यामुळे आमचे काही अधिकारीही जखमी झाले आहेत, अशी माहिती निकम यांनी दिली.

अचानक 100 लोकांचा जमाव आला

    दुसऱ्या रस्त्यावरून अचानक 100 लोकांचा जमाव आला, त्यांच्याकडे शस्त्रे होती, त्यांच्याकडे पेट्रोल होते, त्यांच्याकडे काठ्या होत्या, म्हणून माझी टीम तिथे होती, म्हणून माझी स्वाभाविक प्रतिक्रिया होती की त्यांना तिथे थांबवावे किंवा त्यांना मागे ढकलावे अन्यथा काहीही घडले असते. म्हणून मी पुढे गेलो आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, असं निकम म्हणाले. 

    एक जण पुढे आला त्याच्या हातात कुऱ्हाड होती

    त्यापैकी काही मागे हटले पण त्यापैकी एकाकडे कुऱ्हाड होती, तो पुढे आला आणि माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या हाताला खोल जखम झाली. पण सुदैवाने आमच्या टीममधील कोणालाही दुखापत झाली नाही. लवकरच, त्यांची (आरोपींची) ओळख पटेल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

    हेही वाचा - Eknath Shinde: उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार, 2 माजी आमदारांसह 3 नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश 

    आम्ही असेच धाडसाने काम करत राहू

    मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनी मला फोन करून माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यासोबतच त्यांनी संपूर्ण नागपूर पोलिसांचे कौतुकही केले. यामुळे नागपूर पोलिसांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि भविष्यातही आम्ही असेच धाडसाने काम करत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.