जेएनएन, मुंबई. Aditya Thackeray On Nagpur Violence: सरकार चालवत येत नसल्याने सरकार दंगली पेटवत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी नागपूर घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. भाजपला महाराष्ट्राचे मणीपूर करायचे असून राज्यात शिल्लक असलेले उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचा सरकारचा डाव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आदित्य ठाकरेंचा सरकारची गुप्तचर यंत्रणांवर सवाल
नागपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून नागपुरातूनच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्याच शहरात अशी घटना घडली आहे. ही घटना घडत होती, त्यावेळी पोलीसच उशीरा आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा घटना घडतात किंवा त्याची ठिणगी पडते, तेव्हा गुप्तचर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. हे सरकार सत्तेत आल्यानंतर बीड, परभणी, पुणे येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला याची माहिती मिळते का, असाही सवाल उपस्थित होत आहे. सरकारची गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना काही माहिती आहे किंवा नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Aurangzeb Tomb Controversy: खुलताबादेत औरंगजेबाचा पराभव करणाऱ्यांचे 'विजय स्मारक' बांधावे, विहिंपची मागणी
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी विधानभवन, मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.@AUThackeray pic.twitter.com/0f1ZAh7BVQ
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 18, 2025
उद्योग किंवा गुतंवणूक गुजरातमध्ये पाठवायचा भाजपाचा डाव
महाराष्ट्राचा मणीपूर करणे, प्रश्न पेटवत ठेवणे हा भाजपचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. त्यातून महाराष्ट्रात काही उद्योग किंवा गुतंवणूक येण्याची शक्यता आहे. अशा अस्थिरतेमुळे त्यांना गुजरातमध्ये पाठवायचे, हा भाजपचा डाव आहे. भाजपला सरकार चालवणे जमत नाही, तेव्हा दंगली घडवून जनतेला त्यात गुंतवून ठेवायचे, हेच भाजपचे धोरण आहे, अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.